शेतकऱ्यांसह सर्व जनतेला सुखी समाधानी ठेवण्यासाठी आ. जवळगावकर यांचे महादेवाला साकडे

 हिमायतनगर प्रतिनिधी/  जुन्या वर्षाला निरोप व नवीन वर्षांचे स्वागत आजकाल कशा पध्दतीने साजरा केला जातोय, हे ३१ डिसेंबर रोजी पाहावयास मिळते, मात्र आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी ३१ डिसेंबर रोजी शिखर शिंगणापूर येथील महादेवाला अभिषेक केला. नंतर सायंकाळी शिर्डीच्या साईबाबाचे दर्शन घेतले. ३१ डिसेंबर रोजी देवदेवतांच्या सहवासात राहून सर्वांना सुखी ठेवावे अशी प्रार्थना केल्याचे व्रत विधानसभा मतदार संघात समजताच सर्वांनी समाधान व्यक्त केले. 
हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघासह सर्व जनतेला सुखी ठेवावे असे साकडे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथील महादेवास साकडे घातले आहे, यावेळी देवस्थानचे अध्यक्ष खा.उदयराजे भोसले यांच्या वतीने सचिव प्रफुल्ल प्रभाकर बडवे यांनी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांचा शाल, श्रीफळ व मुर्ती देवून सत्कार केला. यावेळी कैलास पाटील माने, विजय घोगरे, सचिन पवार, निकेश मद्रेवार, अनिल कदम, दयानद बाघमारे, नामदेव जाधव, बालाजी दुधाडे आदींची उपस्थिती होती. 
 

 

 
  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.