छत्रपती शिवाजी महाराजा प्रमाणे सुराज्य नव्याने उभे करण्यासाठी स्वराज्य संघटनेला ताकद द्या-युवराज छत्रपती संभाजी राजे

हिमायतनगर. :- ( बातमीदार )सर्व सामान्य लोकांच्या अडी अडचणी समजावून घेऊन त्या कश्या सोडविता येतात, या साठी आपण ग्रामीण भागात फिरत आहोत. स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतर ही शेतकऱ्यांचे, बेरोजगाराचे, प्रश्न आजही कायमच आहेत. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मी वंशज आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. शिवाजी महाराजांनी सुराज्य चालवीले, परंतू आजची आपण पाहिलेली ग्रामीण भागातील परिस्थिती फार बिकट आहे. आम्ही या राज्यात चाललेली परिस्थती बदलली पाहीजे, गोरगरिबांना त्यांचे न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी मी बाहेर पडलो असून माझे वंशज छत्रपती शिवाजी महाराजांनी चालवलेले सुराज्य पुन्हा नव्याने आम्हाला आणावयाचे, या करिता आपण सर्वांनी स्वराज्य संघटनेला ताकद द्यावी. असे अवाहन युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी केले. 

हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर प्रांगणात शनिवार ता. २४ सायंकाळी सात वाजता छत्रपती संभाजी राजे यांची जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी आयोजित कार्यक्रमात छत्रपती संभाजी राजे बोलत होते. 
स्वराज्य संकल्प अभियानांतर्गत राजे ता. २४ तालूक्याच्या दौर्‍यावर होते. तालुक्यातील कामारी, जवळगाव, वाघी, दिघी, घारापूर, पळसपूर, डोल्हारी, शिरपल्ली, शेल्लोडा, एकंबा, टेंभी, सरसम, करंजी, दुधड सह अनेक ठिकाणी स्वराज्य संघटनेच्या फलकाचे फित कापून अनावरण राजेंनी केले. दरम्यान दुपारी विकास पाटील देवसरकर यांच्या निवासस्थानी छत्रपती संभाजी राजे यांच्या स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती राजे यांच्यासह अनेकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. 
पुढे बोलतांना छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, इथल्या राजकारण्यांनी आपल्या राज्यात उद्योग व्यवसाय उभे केले नसल्याने युवकांना रोजगारासाठी शेजारील तेलंगणात जावे लागते. ही बाब फार दुर्दैवाची आहे. या भागातील किनवट तालूक्यात मौल्यवान वनसंपत्ती आहे. इकडे करण्या सारखे खुप काही आहे, परंतू येथील राजकारण्यांची उदासिनता या भागातील जनतेच्या मुळावर उठली आहे. अधिवेशन नागपूरला चालू आहे. अधिवेशनात शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगाराचे प्रश्न मांडले जात नाहीत, तर आरोप, प्रत्यारोपाचा गोंधळ सुरू आहे. ही बाब दुर्दैवाची ठरते. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी काम केलेले स्व. नेताजी पालकर यांच्या स्मारकासाठी या भागातील राजकीय नेत्याची उदासीन भुमिका मनाला वेदना देणारी आहे. आपलाला नव्याने राज्यात सुराज्य आणावयाचे आहे. आपण सर्वांनी स्वराज्य संघटनेला ताकद देवून सुराज्य निर्माण करण्यासाठी ताकदीने उभे राहीले पाहीजे. असे छत्रपती संभाजी राजे यांनी सांगीतले. 
प्रास्ताविक माधव देवसरकर यांनी केले. तर सूत्रसंचालन गोविंद शिंदे, राम सुर्यवंशी यांनी केले. 
यावेळी स्वराज्य संघटनेचे मराठवाड्यातील पदाधिकारी उपस्थित होते. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव देवसरकर, नवदिप वानखेडे, उत्तम मिराशे, अवधूत पवार, गोविंद शिंदे, राम सुर्यवंशी, बालाजी ढोणे, मुन्ना शिंदे, निलदिप पाटील, अमित पाटील, आदींसह अनेकांनी प्रयत्न केले.
छायाचित्र ओळी हिमायतनगर: छत्रपती संभाजी राजे हिमायतनगर दौर्‍यावर आले येथील बसस्थान परिसरात सभेचे आयोजन केले होते त्या प्रसंगी जनसमुदायला सबोधीत करताना संभाजी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.