हिमायतनगर प्रतिनिधी/ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर मार्फत राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून हिमायतनगर येथील कृषी पदवीधर सदानंद ढगे यांनी शेतीसोबत जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन या व्यवसायाची निवड केली असुन त्यांच्या या यशस्वी उद्योगाची दखल घेऊन नागपूर विद्यापीठाकडून गौरव करण्यात आला आहे.
हिमायतनगर येथील कृषी पदविकाधारक असणारे सदानंद ढगे यांचा पारंपरिक व्यवसाय शेती आहे. त्यांनी शेती सोबत जोडधंदा म्हणून कुक्कट व मांस प्रकिया उद्योगात उत्पादन ते थेट विक्री या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्याबद्दल सदानंद ढगे यांच्यासह परिवाराचा राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर,संचालक विस्तार शिक्षण डॉ. अनिल भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विवेक देशमुख सहयोग अधिष्ठाता पशुवैद्यक महाविद्यालय परभणी, डॉ. रुपेश वाघमारे यांच्या हस्ते श्री सदानंद गणपतराव ढगे व श्याम गणपतराव ढगे यांचा सहपरिवार गौरवपत्र व मान चिन्ह देऊन राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त गौरव करण्यात आला.झालेल्या गौरवाबद्दल जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ चिमन शेट्ये, जिल्हा कृषी अधीक्षक चलवदे,पशुवैद्यकीय अधिकारी सोनटक्के, तालुका कृषी अधिकारी ,यांच्यासह अनेकांनी अभिनंदन कौतुक केले आहे.
