हिमायतनगर प्रतिनिधी/ गेल्या काही वर्षांपासून शहरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे काम भक्तांच्या सहभागातून मंदीराच्या जिर्णोद्धार काम प्रगतीपथावर असुन या कामाचे नारळ फोडून कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
हिमायतनगर शहरातील बाजार चौक मध्ये दक्षिण मुखी हनुमान मंदिर आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचे मंदिर आहे. श्री दत्त जयंती निमित्ताने हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार होणार असल्याने पोलीस निरीक्षक बि. डी. भुसनुर, परमेश्वर मंदिर ट्रस्ट चे संचालक यांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले आहे कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हनुमान मंदिराच्या गेटसह मध्ये भागातील काही काम व वरील भागाचे सुशोभीकरण होणार आहे. हनुमान मंदिर कमिटीने कामाला सुरुवात केली आहे. परमेश्वर मंदिर च्या सुशोभीकरण केल्यामुळे सध्या परमेश्वर मंदिराचा परिसर व नव्याने बसविण्यात आलेले कारंजे भाविकांचे आकर्षण ठरत आहेत. त्याच पद्धतीने या हनुमान मंदिर भाविकांचे आकर्षण होईल अशाच पद्धतीने सुशोभीकरण हनुमान भक्ताच्या सहभागातून होणार असल्याचे परमेश्वर मंदिर ट्रस्ट चे संचालक शांतीलाल श्रीश्रीमाळ यांनी या बोलताना सांगितले आहे. यावेळी हनुमान मंदिर कमिटीचे बाळासाहेब चवरे, संतोष पळशीकर,व डॉ आनंद माने, शंकर पाटील, या कार्यक्रमात उपस्थित होते.
