हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रमासह आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. या संदर्भात सांगोपांग चर्चा करण्यासाठी २० डिसेंबर रोजी जवळगाव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीस काँग्रेस च्या सरपच , ऊपसरपंच, चेअरमन, ऊपचेअरमन सह ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटी चे संचालक आणि नगरपंचायत च्या प्रथम नगराध्यक्ष, नगरसेवकासह सर्व पदाधिकारी यांनी ऊपस्थीत रहावे असे आवाहन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले आहे. १२ डिसेंबर रोज सोमवारी शहरात नारायण गार्डन येथे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या उपस्थितीत तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दुपारी १२.१५ वाजता बैठक आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती...
आगामी निवडणुकी बाबत जवळगाव येथील 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत सांगोपांग चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेण्यासाठी सर्वांच्या सुचनेचा आदर करण्यात येणार आहे.आपण सर्वांनी जवळगावच्या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषदादा राठोड, रफिकभाई, प्रथम नगराध्यक्ष अ.आखील अ.हमीद सेट, कैलास पाटील माने, बाजार समितीचे माजी संचालक संदीपभाऊ पळशिकर ,डॉ प्रकाश वानखेडे, गणेशराव शिंदे, जोगेंद्र नरवाडे,ग्रा.प.सदस्य सोपान बोपीलवार, संजय माने, बापुराव आडे, बाला पाटील टाकराळेकर, नितेश जैस्वाल, सुभाष शिंदे, जनार्दन ताडेवाड, राजीव पाटील शिरफुले,रऊफखान पठाण, दयाळगिर गिरी, सरपंच गौतम दवने, ऊपचेअरमन प्रविण जाधव, सज्जन जाधव, विश्वासराव पाटील वानखेडे, माजी सरपंच माधवराव शिंदे, परमेश्वर जाधव, विकास गाडेकर यांच्या सह अनेकांची उपस्थिती होते.
