कारला येथील आदर्श शेतकरी गोविंद सुरोशे यांच्याकडे असलेल्या शेतजमीन ही शेती ओलिताखाली असल्याने त्यांनी धानपिकाला बगल देत तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली फळबाग इत्यादी पिकांची लागवड केली आहे. त्यातून आपल्या उन्नतीचा मार्ग शोधला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील शेतकरी गोविंद सुरोशे यांनी एक नवीन दृष्टी ठेवून कमी खर्चात जास्तीत जास्त नफा कसा कमविता येईल, या उद्देशाने एक एकरात फळबाग, आंबा, पेरूची 800 झाडे व आंतरपीक लागवड केली आहे. त्यांच्याजवळ असलेल्या शेतीमध्ये विविध पिके घेण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. गत वर्षी नाना साहेब कृषी संजीवनी योजने अंतर्गत 2021 ची लागवड 50 आर क्षेत्रात पेरुंची लागवड केली.सध्या पेरूची फळ विक्री साठी आले आहेत.जवळपास सध्या बाजारात दररोज 2000 रु पेरी विक्री होत असल्याची माहिती शेतकरी गोविंद सुरोशे यांनी दिली. याच वर्षी या पेरूच्या विक्रीतून जवळपास एक लाख रुपये नफा शेतकऱ्यांना मिळाला आहे.
शेतकऱ्याने विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करून नावीन्यपूर्ण उपक्रमाकडे लक्ष वेधले आहे. या नंतर स्वतःकडील पूर्ण शेतात अशा प्रकारच्या पिकांची लागवड करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखविला आहे. त्यांचा कुटुंबातील सर्व सदस्य शेतात स्वतः काम करीत आहेत. पारंपरिक धान उत्पादन शेतीला बगल देऊन या उपक्रमातून त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांना कृषी विभागाचे कृषी सहाय्यक लोखंडे , कृषी सहाय्यक, बालाजी माझळकर कृषी सहाय्यक, रसाळे समुह सहाय्यक,यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे तरूण शेतकरी अंगद सुरोशे यांनी सांगितले आहे.
