हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील धानोरा ज. येथील शेतकऱ्यांचा मुलगा संघपाल तुळशे यांची एमबीबीएस साठी निवड झाली असून सिंधुदुर्ग येथील काॅलेज मध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. त्याच्या यशाबद्दल ग्रामस्थांकडून गौरव करण्यात आला आहे.
धानोरा येथील गरीब शेतकरी कुटुंब असलेल्या संघपाल आनंद तुळशे यांनी चौथी पर्यंत चे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत घेतले होते. पाचवीला असतांना नवोदय परिक्षेत यश मिळवले होते.
वडील आनंद तुळशे हे अल्पभूधारक शेतकरी असल्याने कुठल्याही प्रकारचे शिकवणी वर्ग लावले नव्हते स्वत च्या बुद्धिमत्तेवर अभ्यास करून एमबीबीएस साठी पात्र झाल्यामुळे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यस्थानी संचालक लालताप्रसाद जैस्वाल होते.यावेळी मधुकर ऐणेकर, मधुकर सोळंके, बाबुराव ईटेवाड ,शालेय समिती अध्यक्ष नाथा खिराडे, संचालक नितेश जैस्वाल, ग्रामसेवक पठाण मॅडम, वसंत ऐणेकर, खिराडे सर, बाचकलवाड सर, शंकर ईटेवाड, भगवान तुळशे, लक्ष्मी बाई तुळशे यांची उपस्थिती होती.
