हिमायतनगर प्रतिनिधी/ सरसम बु. येथील अंत्यविधी करून हिमायतनगर कडे परतणाऱ्या स्वर्ग रथाचा महामार्गावर असलेल्या दारूल्ल उलुम जवळ अपघात घडला या रथामध्ये प्रवास करणारे बारा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहेआहे यातील पाच जणांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील सरसम बु. येथील जेष्ठ नागरिक परसराम कांबळे यांचे निधन झाले होते. त्यांचा अंत्यविधी दि. 22 नोव्हेंबर रोजी दुपारी उरकला या अंत्यविधी करीता आलेल्या पाहुणे मंडळींना काही वाहन मिळाले नसल्यामुळे सदरील अंत्यविधी करीता आलेल्या स्वर्गरथात बसुन रथ हिमायतनगर कडे जात असतांना अचानक स्वर्ग रथ गाडीचे पाटे तुटल्यामुळे रथ पलटी झाला आहे .
यातील प्रवास करणारे बारा प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते .यातील 5 गंभीर जखमींना नांदेड शासकीय ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
यातील जखमी सुनंदा दिलीप कांबळे, मीराबाई पांडुरंग तुळसे, पुण्यरथा साखरे ,सगुना तुळसे, संगीताबाई तुळशी हे गंभीर जखमी आहेत त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले तर दिलीप कांबळे ,गंगाराम कांबळे, सुदाम वाठोरे, पांडुरंग वाठोरे, वच्छलाबाई शांताबाई तुळसे, प्रयागबाई तुलसे सह आदीजन किरकोळ जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वैद्यकीय अधिकारी भुरके यांनी जखमी रुग्णांची तपासणी केली. जखमी रुग्णांना राम सुर्यवंशी, मुन्ना शिंदे, बालाजी ढोणे , योगेश चिल्कावार यांनी मदत केली. सदरील प्रवाशांना काही वाहन मिळाले नसल्याने ते प्रवासी स्वर्ग रथाच्या गाडीमध्ये बसुन आले अचानक पाटा तुटल्यामुळे अपघात घडला असल्याचे स्वर्ग रथाचे चालक रामेश्वर पिटलेवाड यांनी सांगितले आहे.
