हिमायतनगर प्रतिनिधी/ पिचोंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भगवान बिरसा मुंडा जयंती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली आहे
पिचोंडी येथील जिल्हा परिषद शाळेत भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त सरपंच गजानन पाटील कदम, उपसरपंच रोशन धनवे, ग्रामसेवक नारायण काळे, ग्रामपंचायत सदस्य सोपान बोंपीलवार, रामा मिराशे, बाबाराव डवरे, मधुकर घोडगे,शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापकजे. टी. जाधव,एम.एल.तोकलवाड यांच्यासह विद्यार्थ्यांच्या उपस्थित बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करून जयंती साजरी करण्यात आली आहे.
कारला ग्रामपंचायत मध्ये जयंती साजरी
कारला ग्रामपंचायत कार्यालयात भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच गजानन पाटील कदम,तंटामुक्ती समिती अध्यक्ष डॉ गफार, सदस्य गजानन पाटील मिराशे, दत्ता चिंतलवाड, यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.
