हिमायतनगर प्रतिनिधी(सोपान बोंपीलवार) गावच्या विकासाचा कना हा सरपंच आणि ग्रामसेवक असतात त्यामुळे प्रत्येक गावच्या सरपंच ग्रामसेवकांनी मिळून गावचा विकास साधायला पाहिजे याबरोबरच गाव विकास समृद्ध करून नावलौकिक मिळविण्यासाठी सरपंच ग्रामसेवकांची भुमिका महत्वाची असल्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी पंचायत समितीच्या सरपंच_ ग्रामसेवक यांच्या तालुकास्तरीय कार्यशाळेत बोलतांना सांगितले आहे.
हिमायतनगर पंचायत समितीच्या सभागृहात आमचे गाव आमचा विकास, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत 15 वित्त आयोग ग्राम पंचायत विकास आराखडा 2023-24 नियोजनात सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित सरपंच ग्रामसेवकांशी संवाद साधला असता आ. जवळगावकर म्हणाले की आमचे गाव आमचा विकास, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानातून प्रत्येकांनी गावचा विकास साधला पाहिजे यामध्ये असलेल्या योजनांची माहिती घेऊन ती योजना गावात राबवता यावी त्या योजनेचा लाभ गावातील लाभार्थ्यांना पोहचला पाहिजे याकरिता सरपंच ग्रामसेवकांची भुमिका महत्वाची असुन दोघांनी मिळून गावच्या विकासासाठी झटले तर गावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही ज्या सरपंच ग्रामसेवकांनी गावासाठी चांगले काम केले त्या सरपंच ग्रामसेवकांचा सन्मान आपण करणार असल्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगितले आहे. यावेळी गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड, विस्तार अधिकारी चिंतावार,प्रशिक्षण देणारे अमरजी आईलवाड, विष्णू गोडबोले,
सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड,गणेश शिंदे, सरपंच विशाल राठोड, कानबा पोपलवार,मारोती वाडेकर, प्रल्हाद पाटील, दयाळगिर गिरी, गौतम दवणे, बाळा पाटील पतंगे,ग्रामसेवक नारायण काळे, भोगे, वडजकर, कासटवार, सटलावार, यांच्यासह तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
