नांदेड प्रतिनिधी/( सोपान बोंपीलवार) भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने हिंगोली येथे झालेल्या सभेत बोलताना कांग्रेस पक्षाचे नेते खा. राहूल गांधी यांनी स्व. राजीव सातव एक एकनिष्ठ पक्षाचा नेता होते आज या स्टेजवर नाहीत यांच दुख मला असल्याचे सांगत स्व राजीव सातव यांच्या आठवणीना उजाळा दिला आहे.
कांग्रेस पक्षाचे नेते खा. राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून नांदेड सह हिंगोली जिल्ह्यात देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरीकांनी उपस्थिती लावली होती. आ. प्रज्ञाताई सातव यांनी दिवसभर भारत जोडो यात्रेत पाई पदयात्रा केल्याचेही खा. राहूल गांधी यांनी सभेत बोलताना सांगितले.
कळमनुरी येथे झालेल्या भारत जोडो यात्रेच्या सभेत बोलतांना खा. राहूल गांधी यांना स्व. राजीव सातव यांची आठवण झाली. त्यांच्या आठवणीने गांधी म्हणाले की राजीव सातव माझा एक विश्वासू मित्र होता , कांग्रेस पक्षासाठी त्यांने अतिशय मोलाची कामगिरी केली होती. स्व. सातव जेंव्हा भेटायला यायचा त्यावेळी हिगोंलीकरांच्या समस्या सागांयचा त्याच्या आठवणी आज आहेत. या शब्दात स्व. राजीव सातव अमर रहे च्या घोषणा देत राहूल गांधी यांनी सातवांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
स्व राजीव सातव यांच्या नंतर कांग्रेस पक्षाची धुरा माजी मंत्री रजनीताई सातव, आ. प्रज्ञाताई सातव हे सांभाळत असुन प्रत्येक कार्यकर्ता जोडण्याचे काम प्रज्ञाताई सातव करीत आहेत. भारत जोडो यात्रेचे भव्य स्वागत करून यात्रा यशस्वी केली आहे.यात्रेच्या निमित्ताने स्व. राजीव सातव यांची आठवण अनेकांना झाली आहे.
