ग्रामीण भागातील रूग्णांची काळजी घेऊन आरोग्य सेविकांनी सेवा द्यावी- सरपंच परमेश्वर गोपतवाड

हिमायतनगर प्रतिनिधी/ मौजे सवना ज. येथे उपआरोग्य केंद्रतील आरोग्य सेविका यांची रिक्त पद असल्याने, संरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी वरीष्ठ आरोग्य अधिकारी नांदेड यांच्याशी संपर्क साधून येथील रूग्णांची गैरसोय होत असल्याचे कळवताच चिचोंर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया पल्लेवाड  यांनी तात्काळ एका आरोग्य सेविकेची नियुक्ती दिली त्यांनी तात्काळ दखल घेतल्याबद्दल  सवना ज ग्रामपंचायतने  वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया पल्लेवाड  यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार केला.
त्यांनी दाखवलेल्या तत्परते बद्दल  संरपंच परमेश्वर गोपतवाड म्हणाले की शेतात राबराब राबुन काळया आईची सेवा करणारी आपली आई, बहिण समजुन आरोग्य सेविका यांनी ग्रामीण भागातील रूग्णांची अतिशय काळजीपूर्वक तपासणी दिलासा द्यावा. आपल्या वरीष्ठांना कुठलाही त्रास होणार नाही. याची दक्षता घ्यावे असेही  म्हणाले. यावेळी संरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष, सरपंच परमेश्वर गोपतवाड, एकघरीचे संरपंच सुनिल शिरोडे, सेवानिवृत्ती मंडळ कृषी अधिकारी गुणवंत टारफे साहेब, डॉ. डोखळे, डॉ. वाघमारे, सर्व सिस्टर मॅडम सवना उपसरपंच प्रतिनिधी सोनबाजी राऊत, गजानन गोपेवाड पाटील, भिमरावदादा राऊत, मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.