हिमायतनगर प्रतिनिधी/ प्रत्येक नागरीकांना स्वतचे हित अबाधित ठेवण्यासाठी आणि हिताचे संरक्षण करण्यासाठी कायद्याचे ज्ञान असणे हि काळाची गरज आयोजित आजादी का अमृत महोत्सव कायदेविषयक जनजागृती शिबीर प्रसंगी तालुका अभिवक्ता संघटनेचे अध्यक्ष अॅड दिलीप राठोड यांनी उपस्थित सांगितले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील गावोगावी आजादी का अमृत महोत्सव निमित्त तालुका विधी सेवा अभिवक्ता संघ व पोलीस स्टेशन हिमायतनगर च्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबीर घेण्यात येत आहेत. या कायदेविषयक शिबीरात नागरीकांना कायद्याचे ज्ञान बाबत मार्गदर्शन करण्यात ऐत आहे. गुरूवारी कारला येथील ग्रामपंचायत कार्यालयात कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यस्थानी सरपंच गजानन पाटील कदम होते. प्रमुख पाहुणे तालुका अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड दिलीप राठोड , अॅड आर. एस. जाधव,अॅड सुनील शिंदे, यू एस कलाने,पि. जे पोकळे न्यालयीन कर्मचारी, जि एस. डगवाल,एस डी. पंडित,एन डी एसके, एस.एम.वागतकर होते. या शिबीरात बोलताना राठोड म्हणाले की प्रत्येक नागरीकांनी अत्यंत अभ्यासू जागरूक, जबाबदार असणे आवश्यक असुन प्रत्येकाने आपापल्या ज्ञानाच्या चौकटीत राहिले पाहिजे असे राठोड म्हणाले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सोपान बोंपीलवार, तंटामुक्ती चे अध्यक्ष डॉ गफार,दत्तात्रय मिराशे, किसन रावते, पांडुरंग कदम, अ. रज्जाक भाई,अशोक बोंपीलवार, साहेबराव घोडगे, यांच्यासह ग्रामस्थ नागरीकांची उपस्थिती होती. या शिबिराचे संचालन अॅड आर. एस. जाधव यांनी केले.
