भारत जोडो यात्रेत नागरिकांनी स्वयंउस्फूर्तपणे सहभागी व्हावे- आ.जवळगावकर


हिमायतनगर प्रतिनिधी/काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रेची महाराष्ट्राची सुरुवात देगलूर पासून होत आहे. सोमवारी दि. 7 नोव्हेंबर रोजी तेलंगणा मार्गे देगलूर शहरात सायंकाळी दाखल होणार आहे . या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सामील व्हावे असे आव्हान आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले आहे.   भारत जोडो यात्रेच्या नियोजनाच्या निमित्ताने शनिवारी शहरासह तालुक्यातील कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या बैठकीत  भारत जोडो यात्रेचे आगमन अर्धापूर येथे होणार आहे . हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने कांग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी यांच्यासह भारत जोडो यात्रेचे भव्य असे स्वागत करण्यासाठी अर्धापूर फाटा चोरंबा पाठिजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन आ. जवळगावकरांनी केले आहे. 

या यात्रेत आपल्या मतदारसंघातून भारूडी भजन, आदिवासी नृत्य, बंजारा नृत्य यासह विविध नृत्य, वाद्यांच्या सान्निध्यातुन भारत जोडो यात्रेचे स्वागताची तयारी करण्याची जबाबदारी नगरसेवक, सभापती,सरपंच,चेअरमन कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यावर राहणार आहे. भारत जोडो यात्रेची सुरूवात नांदेड येथून महाराष्ट्रात होणार असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सुक्ष्म नियोजन होत आहे. या यात्रेत प्रत्येक नागरीकांनी सहभागी होऊन नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रा हि लक्षवेधी ठरणार असल्याचे दाखवायचे आहे.  या ऐतिहासिक पदयात्रेत सहभाग नोंदवून एकजूट दाखवत राहुल गांधींना साथ देण्याचे आव्हान आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी बैठकीत केले आहे.  




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.