हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील अनेक गावातील विद्यार्थी विद्यार्थीना शाळेत जाण्यासाठी खासगी वाहणातुन प्रवास करावा लागत आहे तर अनेक गावात बस बंद असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा मिळत नाही वाळकेवाडी दुधड येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांना कळवताच शुक्रवारी बससेवा तात्काळ उपलब्ध झाली असल्यामुळे विद्यार्थ्यी व पालकांनी जवळगावकर यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
हिमायतनगर येथील शाळेला ग्रामीण भागातील मुलींना जाण्यासाठी अनेक गावात बससेवा उपलब्ध नाही. तर काही गावच्या मुलींना आजही पाई किंवा खासगी वाहनातून शाळेत जावे लागत असल्याची परिस्थिती ग्रामीण भागात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी लक्षात घेऊन प्रत्येक गावात बससेवा सुरू करून देण्याची मागणी पालकांतुन होत आहे.
मौजे दुधड वाळकेवाडी या आदिवासी भागातून सरसम,हिमायतनगर शाळेला जाणाऱ्या मुलींसाठी बस ची अत्यंत गरज हॊती दूधड वाळकेवाडी येथील मुलींनी आ. माधवराव पाटील जवळगांवकर यांच्याकडे बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली हॊती. त्यानुसार आ. जवळगावकर यांनी तात्काळ दुधड- वाळकेवाडी गावच्या मुलींना बससेवा सुरू करून दिली आहे. दि 18 नोव्हेंबर रोजी बस गावात येताच बस व वाहकाचे मुलीनी स्वागत केले. व आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले यावेळी गजानन सूर्यवंशी,संचालक संजय पाटील दूधडकर, केंद्र प्रमुख कोकुलवार , विकास गाडेकर व ग्रामस्थ व शालेय मुलींची उपस्थिती होती.
