हिमायतनगर प्रतिनिधी/ पळसपुर शिवारात गेल्या काही दिवसांपासून पिसाळलेल्या काही कोल्ह्याने धुमाकूळ घातला असुन शेतकऱ्यांच्या शेतातील गोठ्यावर बांधून असलेल्या दोन बैल,एक म्हैस,एक गाय अशा चार जनावरांना चावा घेतला असल्याने या घटनेतील चारही जनावरे दगावली असल्यामुळे ऐन रब्बी हंगामाच्या कामासाठी लागणारे बैलाचा मृत्यू झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर गावच्या पैनगंगा नदी काठी वावरणाऱ्या कोल्ह्याच्या टोळीतील काही पिसाळलेल्या कोल्ह्यांनी धुमाकूळ घातला असुन. पळसपुर येथील शेतकरी आपले जनावरे गोठ्यात बांधून घराकडे आल्यानंतर सदरील पिसाळलेल्या कोल्ह्याने जनावरांना चावा घेतला असल्याची घटना घडली आहे. चावा घेतलेल्या चारही जनावरांचा मृत्यू झाला आहे. जनावरांना चावा घेतल्यामुळे यातील शेतकरी बाबुराव शिरफुले यांचा बैल, विमलबाई वाडेकर यांची गाय, सुभाष वानखेडे यांची म्हैस,विठ्ठल वानखेडे यांचा बैल, या शेतकऱ्यांच्या मालकीची जनावरे होती चारही जनावरे मृत्यू झाल्याची घटना घडली असुन या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागाने सदरील पिसाळलेल्या कोल्ह्ययाचा बंदोबस्त करून वनविभागाने शेतकऱ्यांच्या जनावरांचा मोबदला द्यावा अशी मागणी सरपंच मारोती वाडेकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे केली आहे.
