विज पडून मृत्यू झालेल्या जनावरांचे सानुग्रह अनुदानाचे धनादेश तहसीलदारा कडून वाटप


हिमायतनगर प्रतिनिधी/ यावर्षी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले याबरोबरच विज पडून तालुक्यात अनेक जनावरे दगावल्याची घटना घडल्या होत्या. त्यातील काही शेतकऱ्यांना तहसील प्रशासनाकडून गुरूवारी तहसीलदार यांच्या हस्ते सानुग्रह अनुदाचे चेक वाटप करण्यात आले आहे. 
हिमायतनगर तालुक्यात नैसर्गिक आपत्ती मुळे विज पडून मृत्यू मुखी झालेल्या व पुरात वाहून गेलेल्या जुन ते जुलै 2022 मध्ये घटना घडलेल्या जनावरांचे सानुग्रह अनुदानचे चेक शेतकऱ्यांना गुरुवारी तहसीलदार एन.डी.गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील पळसपुर, मंगरूळ,टाकराळा, कामारवाडी, टेंभी, घारापुर, डोलारी, 
येथील सहा शेतकऱ्यांच्या गाय विज पडून मृत्यू झाल्याची घटना घडल्या होत्या.यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती तहसील प्रशासनाकडून प्रत्येक शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपयांचा धनादेश तहसिलदार एन. डी. गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आला आहे. यावेळी पळसपुर सरपंच मारोती वाडेकर, मंगरूळ सरपंच प्रतिनिधी जिवन जैस्वाल, संचालक संतोष अंबेकर, यांच्यासह सरपंच, शेतकरी यांच्या उपस्थितीत धनादेश वाटप करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.