हिमायतनगर प्रतिनिधी/ सिबदरा शिवारातील मळणी यंत्राद्वारे सोयाबीन काढणीसाठी गेलेल्या एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले असुन तिघेजण बांलबाल बचावले असल्याची घटना घडली आहे.मंगळवारी दुपारी झालेल्या पावसात विज कडाडली या घटनेत सुनिल साहेबराव वायकोळे या मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यामुळे वारंगटाकळी गावावर शोककळा पसरली आहे.
सिबदरा येथे सोयाबीन काढण्यासाठी वारंगटाकळी येथील मळणी यंत्र घेऊन सहा मजूर आले होते. मंगळवारी दुपारी अचानक सुरू झालेल्या पावसाने सोयाबीन काढणे झाल्यानंतर परत गावाकडे मळणी यंत्र घेऊन निघाले असता अचानक पाऊस सुरू झाला.त्यामुळे तिन मजुर मळणी यंत्राच्या खाली बसले तर तिघेजण ताडपत्री पांघरूण बाजुला बसले होते.
याच वेळेत अचानक मळणी यंत्रावर विज पडली असता मळणी यंत्राखाली बसलेल्या तिघांपैकी सुनिल साहेबराव वायकोळे रा. वारंगटाकळी वय (35 ) यांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असणारे गजानन शंकर तोकलवाड , साहेबराव आबाराव तोकलवाड रा. वारंगटाकळी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. एकाच्या कानाला विजेचा शेक लागला तर एकाच्या पायाला जखम झाली आहे. यांच्या सोबत असणारे गोविंद कदम, उमाराव हाके, गजानन करे रा. वारंगटाकळी हे ताडपत्री पांघरूण बसले होते त्यामुळे ते बांलबाल बचावले आहेत.
विज पडून मृत्यू झालेल्या सुनिल साहेबराव वायकोळे या मजुरांच्या पश्चात आई, पत्नी, तिन मुली असा परिवार आहे.
पत्नी डिलीवरी करीता माहेरी गेली असल्याने या मयत तरुणाच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.सदरील प्रेताचे श्वेच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते श्वेच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. सदरील मयताच्या कुटुबिंयाना शासनाने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाकडून तातडीने मदत देण्याची मागणी सरपंच दयाळ गिर गिरी, पोलीस पाटील आवदुतराव पाटील कदम यांच्यासह ग्रामस्थांनी केली प्रेताचे
