नायगाव प्रतिनिधी/शासनाचे दुष्काळ निवारणार्थ आलेले सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कसे मिळेल यासाठी शासनाचा प्रयत्न आहे नायगाव तालुक्यास मंजूर दुष्काळ निधी शेतकर्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी परिपूर्ण प्रयत्न आहे. आलेला सर्व दुष्काळ निधी जिल्हा बँकेकडे वर्ग करण्यात आला आहे. बँकेने ही सदर बाब लक्षात घेऊन शेतकर्यांच्या हातात दिवाळीपूर्वी शासकीय मदत कशी प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान नायगाव चे तहसीलदार गजानन शिंदे यांनी केले आहे.
दि. 18 ऑक्टोबर रोजी शहरातील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने शेतकरी दुष्काळ मदतीचे वाटप करण्याच्या वेळी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी नायगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्रीनिवास चव्हाण, युवा नेते प्रा. रविंद्र चव्हाण, पळसगावाचे चेअरमन माधवराव पाटील उपासे, वंजर वाडी चे चेअरमन पंडित पाटील, बेंद्रे चेअरमन हणमंतराव कदम, बँकेचे विभागीय अधिकारी, आनंदराव मोरे, शाखाधिकारी बि. डी. इंगोले, विजय शिंदे, शेख खायूम सेवानिवृत्त कर्मचारी बि.डी. चव्हाण, एस. के. गुट्टे, भीमाशंकर, गणेश कदम आदींसह लाभार्थी शेतकरी यांची उपस्थिती. यावेळी उपस्थित प्रातिनिधिक शेतकर्यांना मान्यवरांच्या हस्ते सानुग्रह अनुदानाचे वाटप ही करण्यात आले. ___________________________
येत्या दोनदिवसात शेतकर्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील- बँकेचे विभागीय अधिकारी-आनंद मोरे
जिल्हा मध्यवर्ती बँक मार्फत येणार्या 35 गावातील 19919 खातेदार शेतकऱ्यांसाठी 17 कोटी 88 लाख रुपये बँकेकडे प्रशासनाकडून वर्ग करण्यात आली आहेत. त्यातच किसान सन्मान योजनेचे ही पैसे शेतकर्यांच्या खात्यावर पडली आहेत. येत्या दोन दिवसाच्या आता या सर्व शेतकर्यांच्या खात्यावर आलेला निधी वर्ग करण्यासाठी आम्ही परिपूर्ण पणे प्रयत्नशील आहोत. आमच्याकडे मनुष्यबळ कमी असले तरी कार्यात काही सेवानिवृत्त कर्मचारी यांचेही सहकार्य घेऊन कसोटीचे प्रयत्न आम्ही करू पण त्यास प्रशासनासह नागरिकांचेही मोठे सहकार्य आम्हाला आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
-----------------------------------------
एटीएम मुळे शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत होईल.. -प्रा. रविंद्र चव्हाण. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या काही दिवसांत अनेक आधुनिक सुविधा बँक खातेदारां साठी उपलब्ध करून देत आपली आर्थिक घडी ही सुधारली आहे. यातील एटीएम सुविधे मुळे नक्कीच यावेळी शेतकर्यांच्या हातात कमी वेळा त पैसे पोहोचतील पण त्यास नागरिकांनी बँक कर्मचार्यांना सहकार्य करण्याची भावना युवा नेते प्रा. चव्हाण यांनी व्यक्त केली.
