लाईनतांडा येथील तरूण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

हिमायतनगर प्रतिनिधी/ खैरगाव (ज) गट ग्रामपंचायत असलेल्या लाईनतांडा येथील तरूण शेतकरी संतोष लिंबा राठोड वय (30) याने स्वतच्या शेतात दि. 1 आक्टोबर रोजी सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 
     हिमायतनगर तालुक्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे  नापिकी झाली असून यावर्षी चा खरिप गेल्याने बँकेसह ,फायनास्सचे कर्ज परतफेड कशी करावी या विवंचनेत असलेल्या लाईनतांडा येथील शेतकरी संतोष लिंबा राठोड यांने आपल्या शेतात औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दि. 1 आक्टोबर रोजी आपल्या शेतात पत्नी आणि मुलगी यांच्या सोबत शेतात गेले. पत्नी आणि मुलगी निंदन असतांना आपण दुसऱ्या राणात जातो म्हणून गेला तर परत आला नाही त्यामुळे पत्नी आणि मुलीने बघीतले असता औषध प्राशन करून तडफडत असल्याचे दिसून येताच पत्नी मुलीने आरडाओरडा केला. असता  शेजाऱ्याने तात्काळ प्रथम उपचारासाठी हिमायतनगर ग्रामीण रूग्णालयात आणत असतांना रस्त्यातच निधन झाले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली ,भाऊ असा परिवार आहे. मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस हिमायतनगर तालुक्यात झाल्याची नोंद शासन दरबारी असुन त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे.. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.