आडेली देवीला नवस फेडण्यासाठी जाणारा टेम्पो पलटून 25 जण जखमीजखमीवर हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू, अति गंभीर 13 रुग्णांना नांदेडला पुढील उपचारासाठी पाठविले

हिमायतनगर प्रतिनिधी/ हदगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील 25 ते 27 नागरिक तेलंगणा राज्यातील आडेली देवीचा नवस करण्यासाठी जात असताना शिवनी नजीक पिकप टेम्पो पलटी झाल्याने सर्व जण जखमी झाले आहे. त्यापैकी 13 गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय पाठवण्यात आले आहे. एकाच वेळी एवढ्या प्रमाणात रुग्ण आल्याने शहरातील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी उपस्थित होऊन रुग्णांना उपचारकामी मदत केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील रहिवासी असलेले एका कुटुंब तेलंगणा राज्यातील आडेली माता देवीचा नवस करण्यासाठी गावातील काही लोकांना घेऊन जात होते. अचानक किनवट तालुक्यातील शिवनीच्या पुढे जाताच रस्त्याचा अंदाज न मिळाल्याने पिकप टेम्पो पलटी खाल्ला. यात एकाच कुटुंबातील 12 ते 13 जण व इतर गावातील नागरिक असे मिळुन 26 जण जखमी झाले आहेत. यात कोंडाबाई रामराव जाधव, भाग्यश्री प्रभाकर जाधव, लिंबाजी रामराव जाधव, आशा लिंबाजी जाधव, साहेबराव रामराव जाधव, चतुराबाई किशन, मंजुषा प्रभाकर सोळंके, संदीप सुभाषराव जाधव, धनंजय विठ्ठलराव जाधव, खंडेराव बालाजी सोळंके, भागवत भगवानराव सोळंके, प्रभाकर दत्तराव सोळंके, शंकर नाराय सरोदे, प्रभाकर रामराव जाधव, गोदावरी देवानंद सोळंके, सुमन सुभाष जाधव, रितेश प्रमोद वानखेडे, कौशल्य प्रमोद वानखेडे, सुभाष रामराव जाधव, अंजली सुभाष जाधव, गोदावरी शिवराम, परमेश्वर सुभाष जाधव, गायत्री संदीप जाधव यांचा समावेश आहे.

तसेच त्यातील 13 जण गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारसाठी नांदेडला रेफर करण्यात आले आहे. तर ईतर किरकोळ जखमींवर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हादगाव तालुक्यातील नागरिकांचा अपघात झाल्याच समजताचं हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी विचारपूस केली. तसेच पुढील उपचारासाठी नांदेडला पाठवा मी आहे.. असे सांगून रुग्णाच्या नातेवाईकांना धीर दिला.

अपघातातील 26 रुग्ण एकाच वेळी आल्यानंतर रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली होत, यावेळी शहरातील खाजगी डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात उपस्थित होऊन रुग्ण सेवा दिली, त्यामुळे अपघातग्रस्त नातेवाईकांनी आभार मानले आहे, तसेच अपघातग्रस्त नातेवाईकांना येथील हॉटेल व्यावसाईक सादिक चातारकर यांनी नास्ता चहा उपलब्ध करून दिल्याने समाजाचे काहीतरी देणे लागते हे दाखवून त्यांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.