प्रगती कोचिंग क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व पालक मेळावा रविवारी

हिमायतनगर प्रतिनिधी/ प्रगती कोचिंग क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते गौरव -सत्कार करण्यात येणार असून पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक रमेश कदम यांनी केले आहे. 
      हिमायतनगर शहरात अनेक विद्यार्थ्यांना घडवून यशोशिखरावर पोहचवण्यात प्रगती कोचिंग क्लासेसने नाव उज्वल केले आहे. प्रगती कोचिंग क्लासेसच्या मार्च 2022 बोर्ड  परिक्षेतील गुणवंत, NMMS,परिक्षेतील पात्र व उतिर्ण, TROPhy EXAM मधील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व पालक मेळाव्याचे दि. 2 आक्टोबर रोजी रविवारी परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले असुन मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे या कार्यक्रमास पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रमेश कदम संरासह प्रगती कोचिंग क्लासेसच्या शिक्षक वृंद यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.