हिमायतनगर प्रतिनिधी /- शहरातील श्री बजरंग गणेश मंडळाची मागील 14 वर्षापासूनची रक्तदान शिबिराची परंपरा या वर्षी पण अविरत चालू ठेवली असेच सामाजिक उपक्रम इतर मंडळानी देखील राबवून गणेश उत्सव विविध उपक्रमांनी सर्व समाजातील बांधवांनी एकत्रित एकोप्याने साजरा करावा असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी केले आहे.
हिमायतनगर शहरातील श्री. बजरंग गणेश मंडळाच्या वतीने दि. 6 सप्टेंबर रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आ. नागेश पाटील आष्टीकर हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अर्चना पाटील,शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या रक्तदान शिबीर कार्यक्रमात बोलतांना शिवसेना जिल्हा प्रमुख आष्टीकर म्हणाले की हिमायतनगर शहरातील हिंदू-मुस्लीम एकतेचा भाईचाऱ्यांची ओळख संबंध मराठवाड्यात आहे. येथील हिंदू बांधव मुस्लिम बांधवाच्या ईद मध्ये सहभागी होऊन शुभेच्छा देतात तर मुस्लिम बांधव गणेश उत्सव, दिवाळी दसरा यासह सण उत्सव काळात एकत्र येऊन उत्सव साजरा करण्याची चालत आलेली परंपरा आजही कायम आहे. आणि राहणार आहे त्यामुळे गणेश मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवून गणेश उत्सव साजरा करावा आणि विसर्जन मिरवणुकीत कुठलेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रमुख माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी बोलतांना व्यक्त केले आहे.जिजाऊ ब्लड सेंटर नांदेड च्या टिम उपस्थिती होती. पोलीस निरीक्षक बि. डी. भुसनुर यांनी रक्तदान करून शिबीराची सुरूवात झाली आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्याम रायेवार, परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ , पोलीस निरीक्षक बि.डी. भुसनूर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे ,माजी जि. प.सदस्य समदखान,माजी सभापती गजानन तुप्तेवार
,बाळुअण्णा चवरे,संतोष पळशीकर, माजी संचालक रफिक सेठ, विशाल राठोड,विलास वानखेडे ,गजानन चायल, अमोल धुमाळे,प्रकाश रामदिनवार,राम नरवाडे,अनवर खान पठाण, सरदार खान,डॉ.आनंद माने,शंकर पाटील वानखेडे,डॉ.दिगाबंर वानखेडे,डा.कदम,जिजाऊ ब्लड सेंटर नांदेड टिमचे सुरज पाटील दुधडकर यांची उपस्थिती होती. अनेक गणेश मंडळाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रक्तदान शिबिरात सहभागी झाले होते
