पाळजच्या गणरायामुळे तालुक्याचा विकास शक्य झाला-: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन

भोकर प्रतिनिधी/ मौजे पाळज येथील गणरायाच नावलौकीक संबंध राज्यभर नव्हे तर ईतर राज्यातहि आहे.योगायोगाने आज गणेश स्थापणेचा अमृतमहोत्सव साजरा होतो आहे.माझ्या मतदारसंघात हे तिर्थक्षेत्र असल्याने मी स्वताला भाग्यवान समजतो.मी केवळ नाममात्र असुन हे सारं वैभव येथील गणपतीबाप्पा मुळे
तालुक्याचा विकास शक्य झाला आहे असे प्रतिपादन माजी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी ता.६ सप्टेबंर २०२२ रोज मंगळवारी केले आहे.
मौजे पाळज ता.भोकर येथील गणेशमंदिर परिसरातील सभामंडपाच्या लोकार्पण सोहळा झाला त्यावेळी ते बोलत होते.व्यासपीठावर आमदार अमरनाथ राजूरकर, सौ.मंगाराणी अंबूलगेकर, बाळासाहेब देशमुख बारडकर, बाळासाहेब पाटील रावणगावकर,नामदेव आयलवाड,पाळजचे सरपंच विशाखा अवधूतवार, गोपीलवाड नरसारेडृडी,नागनाथ घिसेवाड, सभापती जगदीश पाटील भोसीकर, रामचंद्र मुसळे, भगवान दंडवे ,मनोज गीमेकर,ताहेर बेग,मारोती बल्लाळकर, गणेश राठोड,माधव अमृतवाड , माजी नगरअध्यक्ष साहेबराव सोमेवाड, देवानंद धुत , बाबुराव आंदबोरीकर, पी जी पुजेकर , बाबुराव सायाळकर यांची उपस्थिती होती.श्री.चव्हाण म्हणाले की, पाळज गावातील गणराया हा नवसाला पावणारा गणपती म्हणून नावलौकीक आहे.लाखो गणेश भक्तगण गणेशोत्सव काळात गणरायाच्या पायी नतमस्तक होतात. येथील भक्तगणाची गैरसोय होऊ नये म्हणून सुमारे ४७ कोटी रुपयांचा निधी देऊन विकास केला आहे काहि जण याच श्रेय घेऊन स्व:ताची पाठ थोपटून घेतात.खर तर मी अस काहि म्हणणार नाही.हे सार प्राप्त झालेलं वैभव केवळ येथील गणरायाच्या आशिर्वादाने शक्य झाले आहे मी नाममात्र आहे असे सांगितले.प्रास्ताविक सूभाष चटलावार यांनी केले सूत्रसंचालन गणपत जाधव यांनी करून आभार मानले.भोकर शहरातील ऐतिहासिक महादेव गडावर येथील गणपतीचे विसर्जन केले जाते त्या तलावाची पाहणी करून मोंढा परिसरात डाॅ.शकंरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या सुमारे दिड कोटी रुपयांच्या शेडचा लोकार्पण सोहळा श्री.चव्हाणाच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला होता तीथे भेट देऊन उपस्थित भक्तांना मार्गदर्शन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.