हिमायतनगर (प्रतिनिधी ) भारताला स्वातंञ्य मिळाल्या नंतरही मराठवाड्यातील जनता निजामाच्या जोखडातच होती . निजामाच्या जुलमी व अत्याचारी राजवटीला पुर्ती कंटाळली होती त्यामुळे हैद्राबाद स्टेट स्वतंत्र भारतात विलीन करण्यासाठी येथील तरूण बंड करुन निजामाच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झाली .त्या वेळी आनेकाना विर मरणही पत्कारावे लागले परंतु देशासाठी मरणारी ती माणसं आजही इतिहासात अजरामर होऊन जिवंत आहेत . असे प्रतिपादन जि.प. प्रा . शाळा वडगाव (खुर्द) येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमीत्त आयोजीत कार्यक्रमात बोलताना केले .
या कार्यक्रमासाठी गावातील सेवा निवृत पो.पाटील संभाजीराव जाधव , व्यंकटराव शिन्दे, सुनिल पाटील, अमोल मिराशे, तिरूपती पाटील, अनिल सावते, गजानन तोकलवाड, देवानंद रोकडे, बाळू मानकरी , शालेय व्यवस्थापन समीतीचे अध्यक्षा रामदास जाधव, विष्णू मिराशे,यांच्या सह शाळचे मु .अ. गोविंद पिंगलवाड, सहशिक्षीका सौ सविता कठारे मॅडम, आगणवाडी शिक्षीका नंदाबाई मिराशे, मदतनिस कुसुमबाई वैष्णव यांच्या सह शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते .
पुढे बोलताना गंगाधर वाघमारे म्हणाले की, निजामी सैनिक रझाकाराला येथील जनता वैतागून गेली होती . परंतू हैद्राबाद स्टेट चे राजे कासीम रिझवी हे आपले राज्य स्वतंत्र ठेऊ पाहात होते . निजामाच्या या मनसुब्यांना येथील जनतेने थारा लागु दिला नाही . त्या विरोधात मोठा लढा उभा केला . या लढ्यात आनेकाना विर मरणही पत्कारावे लागले . त्या काळी हे विर देशा साठी मेले , हुतात्मे झाले परंतू ते मेल्या नंतरही आज इतिहासात पिढ्यांन पिढ्या जिवंत आहेत . त्याचे मरण व्यर्थ गेले नाही . असे त्यांनी सांगीतले . या वेळी शाळेतील मुला - मुलींचेही भाषणे झाली . शाळेतील मुल मुली महापुरुषांच्या वेशभुषेत उपस्थित असल्याने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते . या प्रसंगी वडगाव येथीलच दानशुर व्यक्ती सुनिल पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले त्यांनी या वेळी गुणवंत मुला मुलीसाठी आर्थिक मदतीची घोषणा करून भविष्यात आशा गुणी मुलांसाठी त्यांच्या आडचणी सोडविण्यासाठी माझ्या सह आपण सर्व गावकरी सर्वोतोपरी ऊभे राहू असे सांगीतले . या शाळेतून अर्थात आपल्या गावातील बाहेर गावी शिक्षणा साठी असलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी साठी ही आपण उपक्रम राबविले पाहिजे आसा सुनिल पाटील यांनी मनोदय व्यक्त केला . कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मु. अ . गोविंद पिलंगवाड यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली .
