हिमायतनगर प्रतिनिधी( सोपान बोंपीलवार)शेतकऱ्यांना बि. बियाणे खरेदी करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेकडून पिक कर्ज मंजूर करण्यात येते परंतु येथील बँकेकडून शेतकऱ्यांना शेतातील पिके हाती ऐऊ लागले तरी अद्यापही पिक कर्ज मिळाले नसल्यामुळे शेतकरी बँकेच्या चकरा मारून बेजार होत असून येथील बँकेच्या कारभाराकडे लोकप्रतिनिधींसह बँकेच्या वरिष्ठांचे लक्ष नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
हिमायतनगर तालुक्यात भारतीय स्टेट बँकेच्या दोन शाखा आहेत. हिमायतनगर शहरातील बँकेकडे असलेल्या ग्राहकांची अनेक कामे सुरळीत होत असले तरी शेतकऱ्यांची पिक कर्जाची कामे मात्र वर्षभरापासून रेंगाळलेली आहे. तत्कालीन शाखा अधिकारी स्वप्निल आखाडे यांच्या कार्यकाळात बँकेची कामे वेळेत होत होती.
शिस्तबद्धता देखील पहावयास मिळत असे त्याच काळात शेतकऱ्यांच्या पिक कर्जाच्या फाईल मे -जुन महिण्यात बॅंकेनी घेतल्या त्या शेतकऱ्यांना अद्यापही पिक कर्ज मिळाले नसल्याने शेतकरी संतप्त आहेत.
बँकेच्या कारभाराकडे विद्यमान लोकप्रतिनिधीसह वरिष्ठांनी लक्ष दिले तर शेतकऱ्यांच्या पिक कर्जाचा प्रश्न सुटू शकतो असाही विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.
परंतु याकडे लोकप्रतिनिधीसह बँकेच्या वरिष्ठांनी दुर्लक्ष केले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिक कर्जाच्या फाईल धुळखात पडून आहेत. बि बियाणे खरेदी होऊन पेरणी होण्याच्या अशेपोटी शेतकऱ्यांनी बँकेकडे पिक कर्जाच्या फाईल दिल्या होत्या. सप्टेंबर संपत आला असून शेतकऱ्यांची पिके हाती आली असले तरी पिक कर्ज आद्या पर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करीता सावकाराची दारे जिझवावी लागली आहेत. तत्कालीन शाखा अधिकारी आखाडे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर नविन शाखा अधिकारी बर्वे यांनी पदभार घेतला आहे. बँकेची शिस्तबद्धता असली तरी शेतकऱ्यांच्या पिक कर्जाच्या फाईल बद्दल हालचाली दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी पर्यंत तरी पिक कर्ज मिळणार का नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.
माफीसह नविन कर्ज मंजूरी किनवटवरून
काही शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आहे त्या पिक कर्जाची सर्व कामे किनवट येथुन होत असल्यामुळे पिक कर्ज मंजूरी करिता विलंब होत आहे.अनेक शेतकऱ्यांनी पिक कर्जाच्या फाईल देऊन सहा महिने उलटले तरी शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नसल्यामुळे बँकेच्या कामाबद्दल शेतकऱ्यांतुन संताप व्यक्त होत आहे.
