हिमायतनगर प्रतिनिधी /- स्मशानभूमी म्हटली की, डोळ्यापुढे येतो तो शेवटचा क्षण अंत्ययात्रा व त्या अंत्ययात्रेत समाविष्ट झालेले लोक हे असं एकंदरीत चित्र स्मशानभूमीतील दैनीका, शेड, आजूबाजूला स्मशान शांतता मात्र. असं काहीसं चित्र हिमायतनगर शहरातील लकडोबा चौक येथील हिंदू समशानभूमीत पहायला मिळत नाही मागील काही दिवसापासून तेथे मोठ्या प्रमाणात गांजर गवत वाढले असल्याचे दिसून येत होते व या स्मशानभूमीत कुठल्याही प्रकारची पाण्याची लाईटची सुविधा नसल्याचे काही दिवसापूर्वी एका महिलेच्या अंत्यविधीसाठी आलेल्या कुटुंबातील नागरिकांना बोलून दाखवले होते ह्याचा नाहक त्रासही त्यांना झाल्याने ही स्मशानभूमी त्याला अपवाद ठरली होती त्यामुळे शहरातील वार्ड क्रमांक 11 मधील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण डांगे यांनी ह्यावर आवाज उठून शहरातील काही प्रतिष्ठित गावकऱ्यांना सोबत घेऊन दि 5 सप्टेंबर रोजी हिमायतनगर येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे एक लेखी तक्रार करून येथील स्मशान भूमी मधील स्वच्छता व लाईटचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी केली होती त्या पाठपुराव्यानंतर हिंदू स्मशान भूमी येथे हाय मॅक्स लाईट बसवण्यात आला व तेथील वाढलेल्या गांजर गवतावर तणनाशक फवारून येथील समशानभूमीची साफसफाई करण्यात आली त्यामुळे गावकऱ्यांनी लक्ष्मण डांगे ह्यांचे कौतुक केले असल्याचे पाहायला मिळाले...
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 3 सप्टेंबर रोजी परमेश्वर गल्ली येथील एका वृद्ध महिलेचे अचानक दु:खत निधन झाल्याने रात्री उशिरा अंत्यविधीसाठी शहरातील हिंदू स्मशान भूमी येथे अंत्यविधीसाठी गेले असता तेथे कुठल्याही प्रकारची लाईट व पाण्याची व्यवस्था नसल्याचे दिसून आले तेव्हा शहरातील वार्ड क्र 11 मधील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण डांगे यांनी गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांना सोबत घेऊन दि पाच सप्टेंबर रोजी हिमायतनगर शहरातील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे एक लेखी तक्रार केली व येथील स्मशानभूमी मधील वाढलेले गाजर गवतावर तात्काळ तन नाशक फवारून येथे हाय मॅक्स लाईटचा पोल बसविण्याची मागणी केली होती त्यानंतर ह्याचा वेळोवेळी पाठपुरावा केल्याने दिनांक 22 सप्टेंबर रोजी नगरपंचायतीचे स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी बाचे साहेब यांनी येथील स्मशान भूमी मधील हाय मॅक्स लाईट दुरुस्त करून तिथे लख्ख प्रकाश निर्माण करून दिला व दिनांक 23 सप्टेंबर रोजी स्वतः लक्ष्मण डांगे यांनी लक्ष देऊन येथील स्मशान भूमी मध्ये वाढलेल्या गांजर गवतावर तन नाशक फवारून तेथील स्वच्छता केली तेव्हा त्यांनी असे सांगितले की आगामी काळात येथील समशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी मी गावकऱ्यांच्या सहकार्याने आगामी काळात पुढाकार घेऊन येथील स्मशानभूमीला पर्यटन स्थळासारखे करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले
या पाठपुराव्यासाठी वार्ड क्रं.11 मधील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण डांगे,माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, शिवसेना उपतालुकाप्रमुख विलास वानखेडे, बजरंग दल तालुका संयोजक गजानन चायल, राम नरवाडे, मोहन भाऊ ठाकरे ,संतोष वानखेडे, पत्रकार नागेश शिंदे, अरविंद वानखेडे सह आदी जणांनी पुढाकार घेतला होता
