सिंगल फेजचे रोहित्र निकामी झाल्यामुळे पळसपुर गाव अंधारात-संतापलेल्या ग्रामस्थांचा महावितरण समोर उपोषण करण्याचा इशारा


हिमायतनगर प्रतिनिधी /- सिंगल फेजचे रोहित्र निकामी झाले असल्यामुळे पळसपुर गावातील विज पुरवठा गेल्या काही दिवसांपासून खंडीत आहे. महावितरणच्या उपअभियंता यांना सांगुन देखील ग्रामस्थाशी चालढकल करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असुन संतापलेल्या ग्रामस्थांनी दोन दिवसात सिंगल फेजचे रोहित बसवून गावातील विज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. 


पळसपुर येथे महावितरणचे विद्युत उपकेंद्र आहे.  या उपकेंद्रात कुठल्याही सुविधा नाहीत कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. गावात उपकेंद्र असुन देखील वारंवार विज पुरवठा खंडीत असल्यामुळे ग्रामस्थांना रात्र अंधारात जागुन काढावी लागत आहे. दि. 23 सप्टेंबर रोजी पळसपुर गावातील नेते ग्रामस्थांनी उपकार्यकारी अभियंता यांना पळसपुर येथे सिंगल फेजचे 100 चे दोन रोहित्र देण्यात यावे अशी मागणी केली. सिंगल फेजचे रोहित्र निकामी झाले असुन यामुळे गावात अंधाराचे साम्राज्य आहे. सध्या तालुकाभर चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. 
चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे नागरीक भयभीत होत आहेत. महावितरणच्या उपअभियंत्यासह वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी सरपंच मारोती वाडेकर,उपसरपंच गजानन देवसरकर, सभापती डॉ. प्रकाश वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील पतंगे, संजय वानखेडे, नागोराव वानखेडे, किसनराव वानखेडे, नागोराव वानखेडे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन दिले असुन गावाला 100 चे दोन विद्युत रोहीत्र तात्काळ मंजुर करून गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा येत्या २७ सप्टेंबर रोजी महावितरण कार्यालया समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य इशारा दिला आहे.
   सिंगल फेजचे रोहित्र द्या - सरपंच वाडेकर
पळसपुर गावातील सिंगल फेजचे रोहित्र निकामी झाले आहे .यामुळे गावातील नागरीकांना रात्र अंधारात काढावी लागत आहे.याबाबत महावितरणच्या उपअभियंता यांना कळवून देखील सिंगल फेजचे रोहित्र मिळाले नाही येत्या दोन दिवसात रोहित्र नाही बसवल्यास महावितरणच्या कार्यालयासमोर ग्रामस्थांना घेऊन आमरण उपोषण करणार असल्याचे सरपंच मारोती वाडेकर यांनी सांगितले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.