हिमायतनगर प्रतिनिधी/ अतिवृष्टीमुळे कारला येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असुन नाले - बांध फुटून पाणी शेतात शिकल्यामुळे पिंके नाहिसे झाले आहेत. पिक विमा कंपनीकडे विमा भरला आणि पिके गेल्याची तक्रार केली अशा शेतातील पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून मदत देण्याची ग्वाही दिली आहे.
कारला येथे जुलै- आॅगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पहिल्या टप्प्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पहिल्या पेरणीतील बियाणे उगवले नाही दुसऱ्यांदा पेरणी केली त्यातील काही पिक निघाले तर काही उगवले नाही यातच पुन्हा अतिवृष्टी चा तडाखा बसल्यामुळे नाल्याकाठासह इतर भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस पिकांचे अतोनात नुकसान होऊ देखील शासनाने शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. विमा कंपनीकडून तरी जास्तीची मदत मिळण्याची अशा शेतकऱ्यांना आहे. मंगळवारी कारला येथे पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधीनी शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. विमा अर्ज भरून घेतले आहेत. विमा कंपनीचे प्रतिनिधी सचिन लोणे यांच्यासह टीम होती. तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ गफार म्हणाले की गावातील शंभर टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाले असुन विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी विमा देखील काढला आहे विमा कंपनीकडून जास्तीत जास्त मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी सरपंच गजानन कदम, पोलीस पाटील गोपीनाथ लूम्दे, गजानन मिराशे, भिमराव लूम्दे,चंद्रकांत घोडगे, आनंद रासमवाड, तुकाराम कदम, राजेश ढाणके,अगंद सुरोशे, यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
