नांदेड -किनवट राष्ट्रीय महार्गावरील हिमायतनगर जवळ असलेल्या करंजी गावाजवळ आयचर आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन यातील चार जण जागीच ठार झाले ते परराज्यातील रेल्वे कामगार होते. तर आयचर च्या ड्रायव्हर देखील जागीच ठार झाला असून घटनेतील एकूण पाच जनावर काळाने झडप घातली आहे. सदरील घटना शनिवारी सायंकाळी 7:46 घडली आहे.
नांदेड किनवट राज्य महामार्गावर हिमायतनगर जवळ असलेल्या करंजी गावाजवळ भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक आणि आयचरची दि. 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:45 समोरासमोर धडक झाली धडक झालेल्या घटनेतील आयचर चा गाडी क्रमांक- MH 37J .0016 तर ट्रकचा क्रमांक- MH 26BE 1011 असा या दोन्ही गाडीचा क्रमांक आहे.
या घटनेत परराज्यातून रेल्वे कामासाठी आलेल्या चार कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर समोरून येणाऱ्या आयचर च्या ड्रायव्हरचा देखील मृत्यू झाला आहे.
तर रेल्वे कामगार असलेले सहा जण गंभीर जखमी झाले असुन त्यांना पुढील उपचारांसाठी नांदेड रूग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले आहे. सदरील रेल्वे कामगार हे हिमायतनगर तालुक्यात रेल्वे चे काम करीत होते त्यांचा मुक्कामही हिमायतनगर येथे असल्याची माहिती आहे. तर आयचर चा ड्रायव्हर हा भोकर येथील रहिवासी आहे.
या घटनेतील आणखी सहा कामगार गंभीर जखमी असुन त्यांना उपचारांसाठी हलविण्यात आले आहे. घटनास्थळी करंजी, सोनारी येथील नागरीकांनी मदत केली. तर पोलीस निरीक्षक बि. डी. भुसनुर, सहायक पोलीस निरीक्षक महाजन,यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन गंभीर असलेल्या कामगारांना उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याचे सांगितले आहे
.
