हिमायतनगर प्रतिनिधी/( सोपान बोंपीलवार)गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बी. डी. भूसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मार्गावरून पोलिसांनी पथ संचलन करून उत्सव काळात नागरिकांनी नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
कोरोना महामारीला रोखण्यासाठी शासनाने मागील काळात ताळेबंदी घोषित केली असल्याने गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक गणेश उत्सव आनंदात साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामूळे गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडले होते. परंतु शासनाने ह्या वर्षी निर्बंध पूर्णताहा हटविल्याने यावर्षीचा सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जाणार असून तो शांततेत साजरा पार पडावा शहरासह ग्रामीण भागात कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधीत राखण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हिमायतनगर पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असून नागरिकांमध्ये जाग्रुकता निर्माण व्हावी यासाठी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दि 5 सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक बि. डी. भूसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून सर्व पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांना घेऊन पथसंचलन केले .यावेळी गणेश उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक भुसनुर, स.पो.नि.बालाजी महाजन, नंदलाल चौधरी यांनी केले या पथसंचलनात तिन अधिकारी,पोलीस अमलदार व ग्रुहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते.
