गणेश उत्सव काळात शहरासह ग्रामीण भागातील विज पुरवठा खंडीत होणार नाही दक्षता घ्या- राम सुर्यवंशी

हिमायतनगर प्रतिनिधी/ शहरासह ग्रामीण भागात गणेश , गौरी उत्सव साजरा केला जात असुन या काळात गणपती आरती च्या वेळेत सकाळी आणि सायंकाळी विज पुरवठा वारंवार खंडीत होत असुन याचे महावितरण कंपनीने गांभीर्य लक्षात घेऊन सण, उत्सव काळात विज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राम सुर्यवंशी यांनी केली आहे. 
     हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागात  धार्मिक हिंदू सणांपैकी गणेश उत्सव,मंगळा गौरीदेवी स्थापना,दुर्गाउत्सव असे सण लागोपाठ चालू  राहणार आहेत.अशा पवित्र  धार्मिक हिंदू सणांमध्ये दररोज सकाळी,संध्याकाळी नित्यनेमाने गणेश,मंगळागौरीच्यां मुर्तीसमोर आरती,भजन,कीर्तन प्रवचन,भागवत, रामायण,हरी विजय गायनवादन,वाचन सुरू असताना अचानक विजपुरवठा महावितरण शहर व ग्रामीण कार्यालय कडुन वांरवार खंडित केला जात आहे.
 विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची महावितरण कंपनीने  खबरदारी घ्यावी यासाठी भाजपाकडून निवेदन देण्यात आले आहे.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष आशिषभाऊ सकवान,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी,शहराध्यक्ष खंडू चव्हाण,जेष्ठ भाजप कार्यकर्ते कांतागुरु वाळके,युवा मोर्चा शहराध्यक्ष कल्याणसिंह ठाकुर,सेवा सो संचालक राम पाकलवाड,उपशहराध्यक्ष बालाजी ढोणे,सुभाष माने,अजय जाधव, लक्ष्मण चव्हाण,दुर्गेश मंडोजवार, वामनराव पाटील वडगावकर,अनिल माने,सचिन कोमावार,गंगाधर मिरजगावे सर,विनोद दुर्गेकर,ज्ञानेश्र्वर कोरडे यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते...!*

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.