सवना ज. सेवा सहकारी सोसायटीवर सलग पाचव्यांदा चेअरमनपदावर परमेश्वर गोपतवाड यांचे वर्चस्व कायम आ. जवळगाकरांकडून चेअरमन गोपतवाडसह संचालकांचे अभिनंदन

हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यात चळवळीचे गाव असलेल्या सवना ज सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन-उपचेरमन पदाची निवड दि. 2 सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात  तालुका सहाय्यक निबंधक लक्ष्मणराव डवरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.चेअरमन पदी सतत पाचव्यांदा परमेश्वर गोपतवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपचेरमनपदी दिलीप धावजी आडे यांची बिनविरोध निवड झाली आहे वर्चस्व कायम राहिले आहे. सतत पाच वेळा चेअरमन होणारे परमेश्वर गोपतवाड हे तालुक्यात पहिले चेअरमन आहेत. 
दि. 2 सप्टेंबर रोजी सहाय्यक निबंधक लक्ष्मणराव डवरे यांच्या अध्यक्षतेखाली निर्वाचन अधिकारी पदमावार सहाय्यक निवडणूक निर्वाचन अधिकारी  नंदकिशोर आलकटवार यांच्या  उपस्थितीत सवना ज . येथे चेअरमन, उपचेरमन यांची निवड झाली. चेअरमन पदासाठी संचालक दिलीपराव अनगुलवार यांनी परमेश्वर गोपतवाड यांचे नाव सुचविले तर सेवानिवृत्त मुख्याध्यापक संचालक माधवराव बिरकलवार यांनी अनुमोदन दिल्यानंतर  उपस्थिती संचालकांनी टाळ्यांच्या गजरात अनुमोदन दिल्यामुळे चेअरमपदाची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपचेरमन पदासाठी संचालक दिलीप धावजी आडे यांचे विजय जाधव यांनी नावाने सुचवले तर संचालक गणेश भुसावळे यांनी अनुमोदन दिल्यामुळे दिलीप आडे यांची उपचेरमन पदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्वाचन अधिकारी पदमावार यांनी जाहीर केले. यावेळी संचालक दिलीपराव अनगुलवार, माधवराव बिरकलवार, गणपत राऊत, प्रेमसिंग जाधव, गणेशराव भुसाळे, विजय जाधव, सौ. गंगाबाई नामदेव जाधव, सौ. कलावतीबाई लक्ष्मण जाधव, यांची उपस्थिती होती. नवनिर्वाचित संचालकांचे स्वागत देवराव गोपेवाड, राजीव अनगुलवार, सेवानिवृत्त पोलीस पाटील गणपतराव गोपेवाड, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास अनगुलवार, गुणाजी आडे, सोनबा राऊत, सिध्दार्थ राऊत, भारत गटकपवाड, संदीप बिरकलवार, संतोष अनगुलवार, विजय राऊत, साहेबराव बिरकलवार, बाबाराव आकलवाड, यांच्यासह सभासद शेतकऱ्यांनी कौतुक केले आहे. 

 आ. जवळगाकरांकडून सवना सोसायटीच्या संचालकासह परमेश्वर गोपतवाड यांचे अभिनंदन
 
सवना ज . सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकांनी अतिशय संयमाने घेतलेला निर्णय योग्य असुन सतत पाचव्यांदा परमेश्वर गोपतवाड हे बिनविरोध चेअरमन झाले आहेत. त्यांचे खूप खूप अभिनंदन व सर्व संचालकांचे अभिनंदन करीत बिनविरोध निवडीचे जवळगाकरांनी कौतुक केले. लवकरच सवना ज. चेअरमन, उपचेरमन, संचालकांची भेट घेऊन शुभेच्छा देणार असल्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी बोलतांना सांगितले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.