आ. जवळगावकरांच्या उपस्थितीत पार्डी रस्त्याची दुरूस्ती

हिमायतनगर प्रतिनिधी/ अतिवृष्टीने उमरचौक ते रेल्वे अंडर ब्रीजचा रस्ता अतिशय खराब झाला असून वाहणे व शाळकरी मुलांना ञासदायक झाला होता. पार्डी, टेंभी,अंदेगाव, बार्‍हाळीतांडी, एकघरी वाशी जाणारा हा मार्ग आहे.आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी 1 सप्टेंबरला स्वतः उभे राहून दहा ते पंधरा हायवे ट्रिप गिटी टाकून रस्ता उभा राहून दुरुस्त करुन घेतला आहे.
हिमायतनगर ते वाशी,हिमायतनगर ते टेंभी,आंदेगाव, पवना रस्ताही अतिवृष्टीने खराब झाला आहे. तुर्त शहरा लगतचा रस्ता अतिशय खराब झाल्याने हा तात्काळ दुरुस्त केला आहे .
 या प्रसंगी माजी जि.प. सदस्य सुभाष राठोड, कृषी बाजार समिती माजी संचालक रफीक सेठ, माजी नगराध्यक्ष अ.अखील, शहर काॅ. अध्यक्ष संजय माने माजी ता. काॅ अध्यक्ष जनार्धन ताडेवाड,, माजी जि.प. सदस्य समदखाॅन पठाण, अल्पसंख्याक अध्यक्ष फिरोज खाॅन, कृषी सभापती डाॅ. प्रकाश वानखेडे , सुभाष शिंदे, पापा पार्डीकर ,योगेश चिल्कावार, ज्ञानेश्वर शिंदे, बाकी सेठ, खालिद भाई, अनिल मादसवार, असलम भाई, दगडू काईतवाड, बळवंत जाधव, सरपंच शिरडे, आदीसह काॅग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.