हिमायतनगर प्रतिनिधी/ भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांना योग्य वागणूक देऊन कामे होणार आहेत. तत्कालीन शाखा अधिकारी आखाडे यांनी ग्राहकांचे जपलेले प्रेम भावना त्याच पद्धतीने ठेवून काम केले जाणार असून शेतकऱ्यासह खातेदारांची कामे सन्मानाने केली जाणार असल्याचे नव्याने रुजू झालेले शाखा अधिकारी बर्वे यांनी बोलतांना व्यक्त केले आहे.
हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बँकेचे शाखा अधिकारी आखाडे यांनी गेल्या दोन वर्षांत शहरासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची पिक कर्जासह बँकेतील कामे करून मने जिंकली त्यांनी आजपर्यंत च्या शाखा अधिकारी यांच्याही पेक्षा सन्मानाने वागणूक कर्तव्यदक्ष पणाने ग्राहकांची कामे केली.
त्यांना दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांची भंडारा येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर मुंबई येथून मयूर बर्वे रुजू झाले आहेत. स्वप्नील आखाडे यांची भंडारा येथे बदली झाली असून त्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गावो गावी भेट देऊन बँकेच्या कामाबद्दल माहिती देऊन पिक कर्जाबद्दल मार्गदर्शन केले.
व बँकेतील दलाल मुक्त करून थेट शेतकऱ्यांच्या पिक कर्जाच्या फाईल ग्रामपंचायत मार्फत स्वीकारल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या चकरा देखील कमी झाल्या आहेत. स्वप्नील आखाडे यांच्या सारखी कामे करून ग्राहकांना अपलस करणार असल्याचे नव्याने रुजू झालेले शाखा अधिकारी मयूर बर्वे यांनी बोलतांना सांगितले आहे. स्वप्नील आखाडे व नव्याने रुजू झालेले शाखा अधिकारी मयूर बर्वे यांचा कारला पिचोंडी ग्रामपंचायत कडून सरपंच गजानन पाटील कदम, उपसरपंच रोशन धनवे, सदस्य सोपान बोंपीलवार, यांनी सत्कार केला आहे.
