हिमायतनगर प्रतिनिधी /- शहरातील श्री परमेश्वर मंदिर येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालुका शाखेकडून दिनांक 28 ऑगस्ट रोजी संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी येथील समाजाचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना संत सेना महाराज यांच्या जीवकार्याचा इतिहास सांगितला व संतांच्या शिकवणीप्रमाणेच आपण वागले पाहिजे आपण आपला पारंपरिक व्यवसाय करत असताना व्यसनाकडे न वळता बचतीकडे लक्ष केंद्रित करून आपला व आपल्या पाल्यांचा सर्वांगीण शैक्षणिक व आर्थिक विकास कसा करता येईल याकडे लक्ष देऊन काम करावे असे त्यांनी सांगितले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शिंदे व प्रमुख पाहुणे म्हणून हिमायतनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन साहेब, हिमायतनगरचे तलाठी दत्तात्रय पुणेकर, गोदामपाल अवधूत बोडकेवाड , सेवानिवृत्त वनपाल संभाजी गायकवाड, पत्रकार परमेश्वर शिंदे,आदर्श शिक्षक दिलीप कोंडामंगल सर, गायकवाड सर व सचिन कळसे सर यांनी प्रथमतः संत शिरोमणी सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पुण्यतिथी निमित्त पूजन करून अभिवादन केले त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांनी असे सांगितले की संत सेना महाराजांनी समाजाला दिलेली शिकवण आजच्या तरुण पिढीने आत्मसात करण्याची काळाची गरज असल्याचे त्यांनी नेहमी आपल्या कीर्तनातून सांगितले त्याच प्रमाणे आपण आपला व्यवसाय करत असताना आपल्या गरिबीची व कुटुंबाची जाणिव ठेवून व्यसनाकडे न वळता बचतीकडे लक्ष देऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी समाजातील नव तरुण बांधवांना केले त्यानंतर तलाठी पुणेकर यांनी शिक्षणाचे महत्त्व समाजातील बांधवांना समजून सांगितले व शिक्षणामुळेच आम्ही आज या उच्च पदावर पोहोचू शकलो असे अनमोल मार्गदर्शन केले त्यानंतर इतर उपस्थित व्यासपीठावरील प्रमुख मान्यवरांनीसुद्धा समाज बांधवांना मार्गदर्शन केले
यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालुका उपाध्यक्ष पप्पू सोळंके, गणेश वाघांबरे, युवा तालुका अध्यक्ष राज सूरजवाड,रमेश लिंगमपल्ले, सुभाष राचाटकर,साईनाथ चादनकर,चंद्रकांत कळसे,मारोतराव घुंगरे,बाबुराव सोळके,गोपाळ घुंगरे,अवधूत गायकवाड ,सुनील त्रिमलदार,शेखर गंधम,अंकुश शिंदे, बालाजी लिंगमपल्ले,पापा जुनापल्ले,समाधान घुंगरे,विश्वंभर जुनापल्ले,सुनील वाघमारे,गणेश आहेरकर ,सुनील शिंदे, ज्ञानेश्वर लिंगमपल्ले,श्रीकांत घुंगरे,अनिल सूर्यवंशी,परमेश्वर सुरजवाड,गजानन सुरजवाड,अभिजित कळसे,विशाल शिंदे,सह आदी नाभिक समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सचिन कळसे यांनी केले तर आभार नागेश शिंदे यांनी मानले
◾नाभिक समाज बांधवांकडून नागेश शिंदे यांच्या कार्याचा गौरव.
मागील काळात कोरोना महामारीत सर्व नाभिक समाज बांधवांना संघटित करून समाजामधीलच गरीब गरजू नागरिकांना अन्नधान्याच्या मोफत रशन किट वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवून तो यशस्वीरित्या पार पाडला होता त्यानंतर अनेक वेळेस समाज संघटन मजबूत करण्यासाठी नेहमी हिर हिरीने सहभाग घेऊन काम करणारे नागेश शिंदे यांचा उपस्थित सर्व समाज बांधवांनी व मान्यवरांनी त्यांचा सन्मान करून गौरव केला त्यामुळे नागेश शिंदे यांनी सर्व नाभिक समाज बांधवांचे आभार मानले
