हिमायतनगर प्रतिनिधी/ कांग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष जनार्दन ताडेवाड यांनी शहरासह ग्रामीण भागात कांग्रेस पक्ष वाढीसह पक्ष हितासाठी काम करून आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या सोबत एकनिष्ठ राहून आजपर्यंत पक्ष कार्याचे निष्ठेने काम केले असून त्यांच्यासारखे काम तरुणांनी केले पाहिजे असे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड यांनी व्यक्त केले आहे.
हिमायतनगर कांग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष जनार्दन ताडेवाड यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन माजी संचालक शेख रफिकभाई यांनी केले होते. त्यानिमित्ताने जनार्दन ताडेवाड यांना कांग्रेस कार्यकर्त्यांसह अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड म्हणाले की कांग्रेस पक्षाचे काम करतांना कार्यकर्त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे आपले नेते आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष हिताचे काम करून समाजातील गोरगरिबांच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे. जनार्दन ताडेवाड यांनी तालुकाध्यक्ष पदावर असतांना तालुक्यातील कार्यकर्यात्यांशी संपर्क ठेवून पक्ष वाढीसाठी एकनिष्ठपणे काम केले. त्यांच्या सारखेच काम कांग्रेस पक्षातील युवा कार्यकर्त्यांनी आगामी काळात केले पाहिजे असे मनोगत माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड यांनी व्यक्त केले आहे. माजी संचालक शेख रफिकभाई यांनी भव्य असा वाढदिवस करून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी प्रथम नगराध्यक्ष आखीलभाई,सभापती डॉ प्रकाश वानखेडे, परमेश्वर गोपतवाड, गजानन सुर्यवंशी, संजय माने, योगेश चिलकावार, गोविंद बंडेवार,शेख रहिम भाई,अशोक अनगुलवार, अ. बाकी भाई, संतोष शिंदे, फेरोज भाई खुरेशी, खालीद भाई, पंडीत ढोणे, प्रविण कोमावार, यांच्यासह कांग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
