हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील पिचोंडी येथील आदिवासी बांधवांनी दि. 9 आगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे.
पिचोंडी येथे अदिवासी समाज बांधवाच्या वतीने दरवर्षी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येतो. मंगळवारी सकाळी जागतिक अदिवासी दिनानिमित्त अदिवासी समाजाचे जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी उपसरपंच
रोशन धनवे,संदीप मिरशे , माधव धनवे ,किरण धनवे, अर्जुन बनसोडे, रामप्रसाद बोंबले , रामदास चांदोडे, माधव दुडुळे, रामा मिराशे, रघुनाथ बनसोडे, पांडुरंग धनवे ,गणेश देशमुखे, मारोती मिराशे, केशव वानखेडे व पिचोंडी येथील महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
