राज्यात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान साजऱ्या होणाऱ्या घरोघरी तिरंगा अभियान कारला पिचोंडी ग्रामपंचायत कडून गावातील घरोघरी तिरंगा देऊन सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सरपंच गजानन पाटील कदम यांनी केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना प्रमाणे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार हर घर तिरंगा अभियान प्रत्येक नागरीकांनी आपल्या घरावर 13ते 15 आगस्ट दरम्यान तिरंगा ध्वज फडकाऊन आपल्या देशाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करावा असे आवाहन सरपंच गजानन पाटील कदम यांनी केले आहे.
दि. 11 आगस्ट रोजी कारला पिचोंडी ग्रामपंचायत कडून गावातील नागरीकांना तिरंगा ध्वज मोफत भेट देण्यात आले आहे. प्रत्येक नागरीकांनी राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखून आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असे आवाहन ग्रामसेवक नारायण काळे यांनी केले आहे. तिरंगा अभियानात सरपंच गजानन कदम, सदस्य सोपान बोंपीलवार, रामेश्वर यमजलवाड, गजानन मिराशे, गणेश लुम्दे, आनंद सुर्यवंशी,रामभाऊ चिंतलवाड, मारोती ढाणके,पिटेश कदम, जांबुवंत मिराशे,नागसेन गोखले, रंजना गड्डमवाड, आचमवाड, पिंटू पाटील,यमजलवाड, साहेबराव घोडगे, कैलास कांबळे, बालाजी कांबळे,जिवन रावते, यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
