हर घर त‍िरंगा आणि कोवीड लसीकरण अमृत महोत्‍सव अभ‍ियानाच्‍याप्रचाराला आज पासून प्रारंभ

 नांदेड प्रतिनिधी/ – हर घर त‍िरंगा अभि‍यान, आजादी का अमृत महोत्‍सव आण‍ि कोवाडी लसीकरण सुवर्ण महोत्‍सवाच्‍या प्रचारासाठी माह‍िती आणि‍ प्रसारण मंत्रालयाच्‍या केंद्रीय संचार ब्‍यूरो, नांदेड व्‍दारा फि‍रते वाहन प्रचाराला आजपासून प्रारंभ करण्‍यात आला. या ऑडीयो संदेश चि‍त्ररथाचे उदघाटन आज अत‍िरिक्‍त जि‍ल्‍हाधि‍कारी के.आर. परदेशी यांच्‍या हस्‍ते ज‍िल्‍हाधि‍कारी कार्यालय, नांदेड येथे करण्‍यात आले. यावेळी निवासी उपज‍ल्हिाधि‍कारी द‍िपाली मोतीयेळे, उपज‍िल्‍हाधि‍कारी अनुराधा ढालकरी,केंद्रीय संचार ब्‍यूरो चे क्षेत्रीय प्रचार अध‍िकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्रीय प्रचार अधि‍कारी सुम‍ित दोडल यांची उपस्‍थीती होती. 
या वाहनाव्‍दारे राष्‍ट्रभक्‍तीपर गीतांच्‍या माध्‍यमातून दि.13 ते 15 ऑगस्‍ट दरम्‍यान घरोघरी राष्‍ट्रध्‍वज फडकवि‍ण्‍याचे आण‍ि भारतीय स्‍वातंत्रयाच्‍या सुवर्ण महोत्‍सवी वर्ष साजरे करण्‍यासाठी आवाहन करण्‍यात येत आहे. 
हे फि‍रते वाहन 15 ऑगस्‍ट पर्यंत नांदेड जि‍ल्‍हयातील नांदेड, अर्धापुर, भोकर, ह‍िमायतनगर, कि‍नवट, माहुर या तालुक्‍यातील शहरी आणि‍ ग्रामीण भागात जनजागृती करणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.