हिमायतनगर येथील पोलीस ठाण्यात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या बैठकीत शहरातील रस्त्यासह अनेक प्रश्न सरपंच, विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी उपस्थित केले होते. या बैठकीत सरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी ग्रामीण भागातील अवैध देशी दारू बाबत गर्जना केली. गोपतवाड म्हणाले की तालुक्यातील प्रत्येक गावात अवैध देशी दारू बंद व्हावी अशी मागणी केली. गणेश उत्सव हा सण ग्रामीण भागात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येते त्यामुळे आपल्या गणेश उत्सवाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची दक्षता मंडळानी घ्यावी काही अडचणी आल्यास पोलीस बांधवाशी संपर्क साधावा आणि पोलीस प्रशासनाचा अधिकाऱ्यांनी देखील ग्रामीण भागातील गणेश मंडळाना मदत करावी असे आवाहन परमेश्वर गोपतवाड यांनी केले आहे.
या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील, तहसीलदार एन. डी. गायकवाड, पोलीस निरीक्षक बि. डी. भुसनुर, यांच्यासह अधिकारी कर्मचारी पोलीस जमादार उपस्थित होते.
