हिमायतनगर प्रतिनिधी/ शहरासह ग्रामीण भागातील नागरीकांनी गणेश उत्सवासह येणाऱ्या काळातील सण हे शांततेत साजरे करावे या उत्सव काळात कुठल्याही प्रकारे अनुसूचित प्रकार घडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी आणि गणेश उत्सवासह सण शांततेत साजरे करावे असे आवाहन पोलीस ठाण्यात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांनी बोलतांना केले आहे.
हिमायतनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी दि. 23 आॅगस्ट रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आगामी पोळा, गौरी गणेशोत्सवाच्या ,पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक उपस्थितीत संपन्न झाली यावेळी शहरातील राजकीय नेत्यांसह गणेश भक्त ,पोलीस पाटील ,सरपंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ,शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस तहसीलदार डी. एन. गायकवाड, पोलीस निरीक्षक बि.डी.भुसनुर,मुख्याधिकारी रमाकांत जाधव, उपअभियंता लोणे,सहायक पोलीस निरीक्षक महाजन, यांची प्रमुख उपस्थिती होती. या शांतता कमिटी बैठकी दरम्यान उपस्थित नागरीकांशी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील म्हणाल्या की शहरासह ग्रामीण भागातील गणेश मंडळानी गणेश उत्सव काळात गावात व परिसरात दारू पिणाऱ्यासह विक्रेत्यावर कडक निर्बंध लादले जाणार असून या काळात कुणीही दारू विक्री करणार नाही याची दक्षता घ्यावी व पोलीस प्रशासनाच्या नियमांचे मंडळानी पालन करावे, त्याबरोबरच विसर्जन दरम्यान देखील डि. जे. चा आवाज नियमानुसार ठेवून मिरवणूक काढावी सकाळी लवकर विसर्जन मिरवणुक काढून सायंकाळी वेळेत विसर्जन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांनी केले आहे. या बैठकीस पांडुरंग तुप्तेवार, माजी नगराध्यक्ष अ.आखील, कुणाल राठोड, समद खान, म.जावेद ,गजानन तुप्तेवार, परमेश्वर गोपतवाड,रामभाऊ ठाकरे, सरदार खान, राम सुर्यवंशी, संजय माने,फेरोज खान,पवन करेवाड,विलास वानखेडे,शेख रहिम भाई,प्रविण कोमावार, पोलीस पाटील ज्योती मिराशे, वैजनाथ चपलवाड, उदय देशपांडे, सरपंच,मारोती वाडेकर, राम नरवाडे, योगेश चिलकावार, गजानन चायल, गजानन हारडपकर, पापा पार्डीकर,अ.मनानभाई,सुनील चव्हाण,सदाशिव सातव, फाज खान, यांच्यासह सरपंच, नगरसेवक, पोलीस पाटील विविध गणेश मंडळ व पक्षाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
