सार्वजनिक बोअरची मोटरपंप चालू करताना शॉक लागल्याने गौतमचंद पिंचा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप

हिमायतनगर प्रतिनिधी/ नगरपंचायतीच्या प्रशासनाचे शहरातील सार्वजनिक बोर वरील मोटारी आणि त्याच्या सुरक्षाकडे आक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वारंवार सुचना देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने एका नागरिकाचा बोअरची मोटर चालू करताना शॉक लागून मृत्यू झाला आहे, गौतमजी शांतीलाल पिंचा असे मयत व्यक्तीचे नाव आहे, या घटनेला नगरपंचायतीच्या नाकर्तेपणा जबाबदार असल्याचे आरोप नागरिकांतून केला जात आहे. 

हिमायतनगर येथील नगरपंचायत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते आता सार्वजनिक बोरची मोटर चालू करताना एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा नगरपंचायत चर्चेत आली आहे. मागील दोन वर्षांपासून  हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुका रखडलेलेच आहेत. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी शहरातील नागरिकांना हव्या त्या सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहेत. 
शहरातील रस्ते, नाल्या, सार्वजनिक खांबावरील वीज, सार्वजनिक बोअरवरील विद्युत मोटारी व स्टार्टरच्या नादुरुस्तीच्या समस्या नेहमीच्या झाल्या आहेत. यासह बहुतांश भागात सार्वजनिक नळाला पाणीदेखील येत नसल्यामुळे नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागतो आहे. 
 मात्र बोर वरील मोटार पंप चालू करण्याचे ठिकाणची सुरक्षितता नसल्याने नागरिकांच्या जीवावर भेटत आहे. 
असाच प्रसंग  दिनांक 21आगस्ट  रोजी वार्ड क्रमांक 9 मधील एका बोरवर घडला. या ठिकाणी सार्वजनिक बोरची मोटर चालू करण्यासाठी दिलेले गौतम शांतीलाल पिंचा यांना शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न निर्माण झाला असून, नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणा यामुळं एक नागरीक जीवानिशी गेला आहे. प्रशासकीय अधिकारी व यंत्रणेने या प्रकाराकडे लक्ष देऊन सार्वजनिक मोटरपपं चालू करण्याच्या स्टार्टर किटच्या सुरक्षेसाठी पाऊले उचलुन पुन्हा अश्या घटना घडणार नाहीत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

घडलेली घटना अतिशय दुर्दैवी-मुख्याधिकारी जाधव

  शहरातील बोअरची मोटार बंद करून नगरपंचायत चा कर्मचारी वापस आला त्यानंतर त्यांनी मोटार सुरू केली यातच  स्टार्टर चा शाॅक लागून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली  घडलेली घटना  अतिशय दुर्दैवी  घटना  असून याबाबत नगरपंचायत प्रशासन त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात सहभागी होऊन सांत्वन केले असल्याचे नगरपंचायत मुख्याधिकारी शामकांत जाधव यांनी बोलतांना सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.