हिमायतनगर प्रतिनिधी/- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी दि 22 ऑगस्ट रोजी बजरंग दल तालुका संजय गजानन चायल यांच्याकडून भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी इस्लापूर सहस्त्रकुंड येथून निघालेल्या भव्य मोटार सायकल रॅलीत हजारो राम भक्तांनी सहभाग घेऊन जय श्रीराम जयघोष करत परिसर दणाणून सोडले असल्याचे पहायला मिळाले
हिमायतनगर शहराचे जागरुक देवस्थान असलेल्या श्री परमेश्वर मंदिर येथे महादेवाचे खुप मोठे शिवलिंग व परमेश्वर महाराजांची मूर्तीआहे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो त्यामुळे शिवभक्तांसाठी श्रावण महिना खूप खास मानला जातो त्यामुळे हिमायतनगर शहरातील बजरंग दल तालुका संयोजक गजानन चायल यांच्या कडून श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी कावड यात्रा काढण्याची परंपरा मागील 15 वर्षा पासून 15 किलोमिटर जाण्याची परंपरा अविरत सुरू आहे त्यामुळे यावर्षीची सुरवात ईस्लापुर येथील सहत्रकुंड येथील महादेवाचा परमेश्वर बडवे महाराज यांच्या मधुर वाणीतून मंत्रउच्चार करत जल अभिषेक करून श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी दि 22 ऑगस्ट रोजी सुर वात केली या कावड यात्रेत शहरासह तालुक्यातील बजरंगीनी भव्य मोटार सायकल वर सहभाग घेऊन राष्ट्रीय महामार्गावरून भव्य अशी मोटार सायकल रॅली काढत हजारो बजरंगी जय श्री रामाच्या जय घोषात नारे देत आनंद उत्सव साजरा करत हिमायतनगर कडे प्रस्थान झाले तेव्हा त्यांना शहरात ठीक ठिकाणी फळांचे वाटप करण्यात आले त्यानंतर हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर येथे येऊन ही कावड यात्रा विसर्जित करण्यात आली त्यानंतर प्रमुख संयोजकांनी येथील महादेवाचा जल अभिषेक व नंतर आपल्या आई वडिलांचे पाय धुऊन त्यांचे दर्शन घेतात ही ह्या कावड यात्रेची अख्यायिका आहे ही परंपरा अविरत सुरू ठेवण्यासाठी शहरातील अनेक नव तरुण मंडळी ह्या कावड यात्रेत सहभागी झाले असल्याचे पहायला मिळाले ही कावड यात्रा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी तालुक्यातील व पंच क्रोशितील अनेक रामभक्तानी व बजरंगीनी खुप मेहनत घेतल्याचे सुद्धा पहायला मिळाले..
◾ ठिकठिकाणी कावड धारी भावीक भक्तांना फळांचे वाटप ◾
सहस्त्रकुंड इस्लापूर येथून निघालेल्या भव्य अशा कावड यात्रेतील बजरंगी ना हिमायतनगर शहरातील पवन फर्निचर अँड हार्डवेअर सेंटरचे पवन गुंडेवार यांच्या कडून फळांचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर शहरात ठिकठिकाणी बजरंगीना दूध व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती ह्या कावड यात्रे साठी अनेक रामभक्तानी परिश्रम घेतले
