माजी मुख्यमंत्री कांग्रेस पक्षाचे नेते अशोकराव चव्हाण हे कांग्रेस पक्ष सोडणार नाहीत त्यांची भाजपात जाणार असल्याची चर्चा झाल्यामुळे कांग्रेस पक्षातील हितचिंतकांत संभ्रम निर्माण झाला होता. तरी
भाजपात जाण्याची केवळ अफवा असुन त्यात कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही असे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत जवळगावकर म्हणाले की सध्या राज्यात दोघांचे सरकार आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 75 हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.याबरोबरच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपात जाण्याची चर्चा महाराष्ट्रभर झाली असल्याचे पत्रकारांनी जवळगावकर यांना विचारले असता ते म्हणाले की मी अशोक चव्हाण यांच्या सोबत दोन दिवसापासून होतो.ते कांग्रेस पक्ष सोडणार नाहीत त्यांचा भाजपात जाण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही.आणी ते अशोक चव्हाण यांनीही स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेत काहिही तथ्य नाही असे आ. जवळगावकर यांनी बोलतांना सांगितले आहे.यावेळी सुभाष राठोड.,सभापती डॉ प्रकाश वानखेडे,जनार्दन ताडेवाड, संजय माने,अ. आखील अ. हमीद,समद खान, गजानन सुर्यवंशी, शेख रफिक भाई,योगेश चिलकावार, ज्ञानेश्वर शिंदे,शिवाजी पाटील, फेरोज खान, दिलीप राठोड, यांच्यासह कांग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
