नांदेड जिल्ह्यातील हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात तब्बल तिन वेळा अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे . राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 75 हजाराची मदत द्यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी केली आहे.
हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात रविवारी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आ. जवळगावकर म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत प्रथम भेटून निवेदन देऊन दोन्ही तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीची माहिती दिली व ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 75 हजाराची करण्याची मागणी केली होती.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने अद्यापही आर्थिक मदत जाहीर केली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येणार नाही आहेत. त्यांनी हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन हेक्टरी 75 हजाराची सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.यावेळी सुभाष राठोड.,सभापती डॉ प्रकाश वानखेडे,जनार्दन ताडेवाड, संजय माने,अ. आखील अ. हमीद,समद खान, गजानन सुर्यवंशी, शेख रफिक भाई,योगेश चिलकावार, ज्ञानेश्वर शिंदे,शिवाजी पाटील, फेरोज खान, दिलीप राठोड, यांच्यासह कांग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
