मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतास मोठ्या संख्येनी उपस्थित रहा- खासदार हेमंत पाटील*

नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांना केले आवाहन
नांदेड प्रतिनिधी/राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (ता.आठ) नांदेड आणि हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत. सोबतच दोन्ही जिल्ह्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन देखील करणार आहेत सोबतच कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे, असे आवाहन हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड येथील विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते सचखंड श्री हूजूर साहेब गुरुद्वाऱ्यात जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर तरोडा नाका भागातील गोदावरी अर्बन सहकारी संस्थेच्या सहकारसूर्य या मुख्यालयास भेट देणार आहेत. नांदेड उत्तर चे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नांने सुरू असलेल्या निळारोड (गुरुजी चौक) येथे एका विकास कामाचे भूमिपूजन, पासदगाव आसना नदीवरील पुलाचे भूमिपूजन अश्या विविध विकास कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे तसेच नांदुसा येथील पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी करण्यासोबतच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा देणार आहेत. त्यानंतर भक्ती लॉन्स येथे होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यास मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. 

नांदेड जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपुन मुख्यमंत्र्यांचा ताफा आसनामार्गे अर्धापूर, वारंगा, बाळापूर, कळमनुरी, हिंगोली येथे पदार्पण करणार आहेत. हिंगोली येथे आमदार संतोष बांगर यांनी आयोजित केलेल्या कावड यात्रेत मुख्यमंत्री सहभागी होणार असून, त्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. पुढे लिंबाळामार्गे औंढा (ना.) येथील औंढा नागनाथ देवस्थानचे दर्शन घेऊन मालेगाव मार्गे पुन्हा नांदेड कडे परतणार आहेत. नांदेडहून विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नांदेड – हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विकासाच्या बाबतीत नेहमी पुढाकार घेणारे एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे सामान्य नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा सर्वांसाठी ऊर्जा देणारा असा अविस्मरणीय ठरणारा आहे. तेव्हा जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार हेमंत पाटील, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.
नांदेड – हिंगोली जिल्ह्याचा रखडलेला विकास पुन्हा झपाट्याने सुरु होईल- 
मुळात एकनाथ शिंदे हे एक सामान्य लढाऊ कार्यकर्ता म्हणून नावारुपाला आलेलं उद्योन्मुख नेत्रत्व आहेत. आजपर्यंत त्यांनी विकास कामास प्राधान्य दिले आहे. आज ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने पहिल्यांदा त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रक्रिया केंद्रास 100 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आहेत. त्यामुळे नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील रखडलेले विकास कामे पुन्हा वेगाने सुरु झाल्याने हिंगोली ,नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील सर्वसामन्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
*- खासदार हेमंत पाटील*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.