पंचवीस वर्षांनी सवना ज. सोसायटी अखेर बिनविरोध -गोपतवाड गटाला दहा तर विरोधी गटाला तिन

हिमायतनगर प्रतिनिधी/ सवना ज .सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या सेवटच्या दिवशी 10 आगस्ट रोजी गोपतवाड गटाला दहा तर विरोधी गटाला तिन जागा देण्याची तडजोड झाल्यामुळे बिनविरोध निवड झाली आहे. सदर निवडून बिनविरोध व्हावी यासाठी आ.माधवराव पाटील जवळगावकरांच्या नेतृत्वाखाली कांग्रेस पक्षाच्या जेष्ठ मंडळींनी परिश्रम घेतले. सेवठच्या क्षणी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांने देखील चागंलाच हातभार लावल्यामुळे निवडणुकीवर पडदा पडून सवना ज.येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक हि पहिल्यांदाच बिनविरोध झाली आहे. 
    सवना ज. च्या सेवा सहकारी सोसायटीच्या तेरा जागेसाठी निवडणूक जाहीर झालेली होती. गोपतवाड गटानी 25 तर विरोधी गटाने 12 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. एक उमेदवार गोपतवाड गटाचा बिनविरोध आला होता. मध्यतंरी विरोधी गटाच्या एका उमेदवारांनी आपला अर्ज माघार घेतल्यामुळे या गटाचे दोन उमेदवार निवडणूक होण्यापूर्वीच विजयी झाले होते. 10 आगस्ट रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अतिंम तारीख होती. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी हि निवडणूक बिनविरोध व्हावी असे कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्यानुसार काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड,माजी संचालक शेख रफिकभाई, खरेदी विक्री संघाचे संचालक बालासाहेब पाटील,शेख रहिम सेठ, जनार्दन ताडेवाड, यांनी दोन्ही गटाना एकत्र करून बिनविरोध तडजोडी साठी कठोर परिश्रम घेतले. सेवठच्या क्षणी युवा सेना तालुका प्रमुख विशाल राठोड यांनी यासाठी हातभार लावला. गोपतवाड गटाला दहा संचालक, चेअरमन, उपचेअरमन,आणि विरोधी गटाला तिन संचालक देण्याचे ठरल्यावरुन हि निवडणूक बिनविरोध झाली आहे. बिनविरोध निवड झालेल्या संचालकात गोपतवाड गटाकडून सरपंच परमेश्वर गोपतवाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधवराव बिरकलवार, सेवानिवृत्त कृषी विभागाचे अधिकारी दिलीपराव अनगुलवार, गणेशराव भुसाळे, दिलीप आडे, फुलसिंग पवार, गणपत राऊत, विजय जाधव, सौ. कलावती लक्ष्मण अनगुलवार, सौ. गंगाबाई नामदेव अनगुलवार,विरोधी गटाकडून आनंद अनगुलवार, बालाजी आलेवाड, विक्रम गोपेवाड, आदिंचा समावेश आहे. 
आ. जवळगावकरांच्या आदेशमुळे सोसायटी बिनविरोध - गोपतवाड
गेल्या पंचवीस वर्षापासून सोसायटी चेअरमन असुन सर्वच्या सर्व संचालक बहुमताने निवडून ऐऊन एकहाती सत्ता आल्याचा इतिहास सवन ज. , रमनवाडी, गणेशवाडी, एकघरी, चा आहे. यावेळी देखील जेष्ठ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांच्या बळावर सर्वच उमेदवार विजयी झाले असते अखेर आ. माधवराव पाटील जवळगावकर यांचा आदेश शिरसावंद्य मानने हे आपले कर्तव्य असल्याचे सरपंच परमेश्वर गोपतवाड म्हणाले त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कांग्रेस पक्षाच्या पुढाऱ्यासह युवा सेना तालुका प्रमुखांनी मध्यस्थी केल्यामुळे हि निवडणूक बिनविरोध होण्यास वाव मिळाला आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.