हिमायतनगर प्रतिनिधी/ भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कांग्रेस पक्षाच्या वतीने आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या सरसम ते हिमायतनगर आझादी का गौरव पदयात्रेस उत्फुर्त प्रतिसाद मिळाला असून आ. जवळगावकर यांनी तिरंगा हातात घेऊन सात किलोमीटर पदयात्रा काढून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव घरोघरी तिरंगा लावून साजरा करावा असे आवाहन केले आहे.
हिमायतनगर कांग्रेस पक्षाच्या वतीने आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली हदगाव विधानसभापक्ष निरीक्षक संजय लहानकर यांच्या उपस्थितीत आजादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील पदयात्रा सरसम येथुन निघून हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली होती.आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी तिरंगा हातात घेऊन दहा किलोमीटर पदयात्रा केली. पदयात्रेत कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणासह देशभक्तीपर गीतांनी शहर दुमदुमूले होते. या पदयात्रेत हदगाव कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आनंदराव भंडारे, माजी जि.प.सदस्य सुभाष राठोड,अ.आखील , डॉ प्रकाश वानखेडे, मजहर मौलाना, ज्ञानेश्वर शिंदे, शेख रफिकभाई, परमेश्वर गोपतवाड,संजय माने,योगेश चिलकावार, मजर मौलाना, अॅड अतुल वानखेडे, प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर,जनार्दन ताडेवाड,शाम जक्कलवाड, प्रशांत देवकते,गोविंद बंडेवार , बापुराव आडे,गजानन सुर्यवंशी, दिलीप राठोड, हानिफ भाई, श्री दत्त पाटील सोनारीकर, सरपंच दयाळ गिर गिरी, फेरोज खान ,अ.बाकी ,पापा पार्डीकर, फेरोज खुरेशी,दशरथ सावले, मोहन ठाकरे,प्रविण जाधव,रोशन धनवे, यांच्यासह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच,संचालक ,आदी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ संख्येने उपस्थित होते
