हिमायतनगर प्रतिनिधी /- नांदेड जिल्ह्यातील बरबडा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयातील दहावीच्या वर्गात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचे तब्बल ३२ वर्षानंतर स्नेह संमेलन मेळावा नांदेड येथील बजाज फंक्शन हाँलमध्ये वाट्स अँप निख्खळ मित्र ग्रुपचे दिगांबर माने, विल्याज बेग यांच्या पुढाकाराने मोठ्या आनंदात खेळी-मेळीच्या वातावरणात स्नेह सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर औद्योगीक प्रशिक्षण संस्था अर्धापुर येथील प्राचार्य विश्वांबर कंदलवाड , अंबाजोगाई येथील कषि महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. संजय बंटेवाड, मुंबई येथील रिलायंस कंपनीचे जनरल मँनेजर आनंद हांबर्डे, हंगरगा जि. प. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी मेतलवाड, ग्रामसेवक प्रविण दमकोंडवार, ग्रामसेवक नारायण शिंदे, पळसपुरचे सरपंच मारोती वाडेकर, बरबड्याचे माजी सरपंच बालाजी मद्देवाड साहेब, शिक्षीका, संगिता रेगुडे, मेनका बडुरे, आलेवार मँडम, सहशिक्षक दिलीप जेटेवाड, सतीष व्यंकटपुरवार, पोलीस कर्मचारी मारोती माने, डी.के. पवार, आरोग्य कर्मचारी अशोक ढवळे, माधव वटपलवाड यांचा सन्मान करण्यात आला.
ज्यांनी मागील सहा महिण्यांपासुन वाँट्सअँप निख्खळ ग्रुप तयार करून सर्व मित्र-मैत्रीनींना तब्बल ३२ वर्षानंतर एकत्र करण्याचा योग दिगांबर माने, विल्याज बेग, शिवराम आनेमवाड, व्यंकट पुरवार, मारोती माने, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे मुकुंद ढवळे, आणि ग्रुपला सक्रीय करून बरबडा येथील अजमोद्दीन शेख यांनी सर्व मित्रानी या स्नेह सम्मेलनाला यावे अशी विनंती ग्रुपच्या माध्यमातून केली. या सम्मेलनासाठी संभाजीनगर, मुखेड, नायगाव, धर्माबाद, आंबेजोगाई, मुंबई, अर्धापुर, हिमायतनगर, नांदेड येथील अशा एकुन ९५ मित्र एकत्र येऊन शालेय जीवनातील गोष्टीना उजाळा देण्यात आला.
यावेळी लावणी नृत्य, गीत गायन उत्कृष्टपणे सादरीकरण करून आपला आनंद व्यक्त केला. प्रत्येकाने आप आपले मनोगत व्यक्त करून सैराट या मराठी चित्रपटातील झिंगाट या गितावर नत्य सादर करून शेवटी सर्वांनी मिळून स्नेह भोजनाचा मनमुराद स्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
